Tuesday, March 18, 2025
HomeमानिनीSummer Travelling Tips : उन्हाळ्यात या बेस्ट ठिकाणांना द्या भेट

Summer Travelling Tips : उन्हाळ्यात या बेस्ट ठिकाणांना द्या भेट

Subscribe

उन्हाळ्या सुरु झाल्यावर आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायचं प्लॅनिंग करतो. उन्हाळ्यात महाराष्ट्रातील तापमान खूपच वाढते, त्यामुळे सुट्टी घालवण्यासाठी थंड आणि निसर्गरम्य ठिकाणे शोधणे खूप महत्वाचे आहे. राज्यात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही उन्हाळ्याच्या उष्णतेपासून सुटका करून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता. आज आपण जाणून घेऊयात उन्हाळ्यात कोणत्या बेस्ट ठिकाणांना आपण भेट देऊ शकतो.

उन्हाळ्यात तुम्ही काही समुद्रकिनारे, धबधबे, आणि जंगल सफारी यांसारखे उत्तम पर्याय निवडू शकता.

महाबळेश्वर

तुम्ही उन्हाळ्यात महाबळेश्वरला जाणून भेट देऊ शकता . महाबळेश्वर हे उन्हाळ्यात जाण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. उन्हाळ्यात महाबळेश्वरमध्ये हवामान आल्हाददायक असते उन्हाळ्यात महाबळेश्वरला भेट देण्याची काही कारणे म्हणजे हवामान आल्हाददायक असते, थंड वाऱ्याची झुळूक मिळते, मनमोहक दृश्ये मिळतात, स्ट्रॉबेरी पिकिंग करता येते.

पाचगणी

उन्हाळ्यात पाचगणी हे एक आनंददायी ठिकाण असते. हिरव्यागार लँडस्केप, आल्हाददायक हवामान आणि साहसी क्रियाकलापांमुळे पाचगणीला भेट देण्यासाठी लोक येतात. पाचगणी हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते.

माथेरान

उन्हाळ्यात माथेरान हे पर्यटनासाठी आकर्षक आणि सुंदर असे ठिकाण आहे. वाहनमुक्त हिल स्टेशन लुईस पॉइंट, इको पॉइंट, वन ट्री हिल यांसाठी खूप प्रसिद्ध आहे.

खंडाळा-लोणावळा

उन्हाळ्यात लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाणे आल्हाददायक असते. या ठिकाणांना भेट देण्यासाठी मार्च ते जून हा महिना उत्तम आहे.

अंबोली

कोकणातील थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गरम्य सौंदर्यासाठी, स्वर्गीय धबधब्यांसाठी आणि हिरव्यागार लँडस्केप्ससाठी ओळखले जाते. तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत अंबोली या जागेला भेट देऊ शकता.

चिखलदरा

उन्हाळ्यात चिखलदरा हे एक उत्तम ठिकाण आहे. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे जे सेमाडोह तलाव, गविलगड किल्ला, पेंच राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. या भागात वातावरण थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या उष्णतेपासून आराम मिळतो.

हेही वाचा : Photography : फोटोग्राफीची आवड? हे आहेत करिअर ऑप्शन


Edited By : Prachi Manjrekar

Manini