Wednesday, January 15, 2025
HomeमानिनीMumbai Travel Destination : थंडीत मुंबईच्या या ठिकाणांना भेट द्या

Mumbai Travel Destination : थंडीत मुंबईच्या या ठिकाणांना भेट द्या

Subscribe

हिवाळ्यात वातावरण प्रसन्न आणि आनंददायी असल्यामुळे बरेच लोक या दरम्यान फिरायला जातात. या दिवसात फिरायला जायची मज्जा काही वेगळीच असते. तसेच डिसेंबरमध्ये अनेक सुट्ट्या असल्यामुळे तुम्ही या दरम्यान फिरायला जाऊ शकतात. आता लवकरच नवीन वर्ष सुरु होणार असून या दरम्यान बऱ्याच सुट्या असल्यामुळे लोक कुठे तरी जायचं प्लॅन करतात. त्यामुळे बऱ्याच जागेचं बुकिंग हे फुल झालेलं असत. बुकिंग फूल झाल्यामुळे आपल्याला कुठे जाता येत नाही. अशावेळी तुम्ही निराश न होतात, मुंबईच्या काही ठिकाणांना जाणून भेट देऊ शकता.

मुंबईत देखील अशी बरीच ठिकाण आहेत, सुंदर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत जिथे जाऊन तुम्ही तुमची सुट्टी आनंद घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या जागांची निवड करू शकता . बऱ्याचदा ही ठिकाणे आपल्याला माहित नसतात. तर आज आपण जाणून घेऊयात, थंडीत मुंबईच्या कोणत्या ठिकाणांना जाऊन आपण भेट देऊ शकतो.

गोराई बीच

गोराई बीच हे ठिकाण बोरिवली जवळ असून समुद्रकिनारा निसर्गरम्य वातावरण आणि शांतात यासाठी हे प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद घेऊ शकता. गोराईमध्ये अनेक रिसॉर्ट्स देखील आहेत जिथे तुम्ही राहू शकता.

मढ आयलंड

रोजच्या धावळीपळीमुळे आणि मुंबई सारख्या ठिकाणी शांतात सहसा आपल्याला मिळत नाही. अशावेळी तुम्ही मालाड येथे असलेल्या मढ आयलंड जाऊ शकता. हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात असून तुम्ही येथे शांत वेळ घालवू शकता. या ठिकाणी लहान रिसॉर्ट्स आणि व्हिलाज आहेत जे राहण्यासाठी उत्तम आणि सुरक्षित आहेत.

संजय गांधी नॅशनल पार्क

संजय गांधी नॅशनल पार्क हे जंगल सफारी आणि कन्हेरी लेणी यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अशा बऱ्याच जागा आहेत ज्या पाहण्यासाठी उत्तम आहेत. हे ठिकाण बोरिवली येथे आहे.

अलिबाग

मुंबईपासून काही अंतरावर असलेले हे ठिकाण समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.बरेच लोक सुट्यांमध्ये या ठिकाणी जातात सुट्टीचा आनंद घेतात. अलिबागमध्ये राहण्यासाठी अनेक बीच रिसॉर्ट्स आणि होमस्टे आहेत.

हेही वाचा : Travel Destination : 2025 मध्ये या सुंदर ठिकाणांना भेट द्या


Edited By : Prachi Manjrekar

Manini