हेल्दी आरोग्यासाठी आपण डाएट, जिम किंवा योगाचा आधार घेतला जातो. मात्र सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात कामाचा ताण अधिक वाढला गेल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशातच नक्की कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे सुद्धा विसरायला होतो. मात्र तुमच्यासोबत हे सतत होत असेल तर तुमच्यात पुढील काही व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. यामुळेच डिमेंशियाची स्थिती निर्माण होऊ शकते.
डिमेंशिया म्हणजे काय?
हा एक प्रकारचा विसरण्याचा आजार आहे. मात्र एखाद्या व्यक्तीत व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असेल तर त्याला डिमेंशिया होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, या व्हिटॅमिनचे नाव कोबेलेमिन आहे. खासकरुन ते यकृतात स्टोर असत आणि शरीरातील काही महत्त्वाचे फंक्शनच्या कार्यात मदत करते. व्हिटॅमिन B12 चा ब्रेन आणि नर्व सेलच्या डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाचे योगदान असते. जर शरीरात याची कमतरता निर्माण झाल्यास तर मुलांपासून ते वयस्कर लोक याचे शिकार होतात. या आजारात विचार करण्याची क्षमता अत्यंत वाईट पद्धतीने प्रभावित होते.
डिमेंशियाची लक्षणे काय आहेत?
-महत्त्वाच्या गोष्टी विसरणे
-विचार करण्यास समस्या येणे
-लहान-लहान समस्या सोडवण्यामध्ये गोंधळून जाणे
-हरवल्यासारखे राहणे
-सांख्यिकी मोजमाप चुकणे
-बोलताना समस्या येणे
हेही वाचा- हातापायाला सतत घाम येतो, मग हे वाचा