Friday, December 8, 2023
घरमानिनीHealthशरीरातील व्हिटॅमिन 'डी' च्या कमतरतेमुळे दिसतात ही लक्षणे

शरीरातील व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे दिसतात ही लक्षणे

Subscribe

हेल्दी राहण्यासाठी शरीराला काही पोषक तत्त्वांची गरज असते. जसे की, प्रोटीन, कॅल्शिअम आणि अन्य प्रकारचे व्हिटॅमिन्स. जर यापैकी एकाची कमतरता निर्माण झाल्यास तुम्ही आजारी पडू लागता. तुमचे शरीर योग्य पद्धतीने काम करण्यास सक्षम राहत नाही. अशातच व्हिटॅमिन डी ची कमतरता थंडीत जाणवू लागते. काही वेळेस आपले शरीर याचे संकेत देतात पण नक्की असे का होते हे कळत नाही. शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे नक्की काय लक्षण दिसतात हे पाहूयात.

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे दिसतात ही लक्षणे
-सर्वात प्रथम तुमची हाडं, स्नायू दुखतात. खरंतर व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास गाठ येण्याची समस्या ही होते.

- Advertisement -

-शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. याच कारणास्तव तुम्ही आजारी पडू शकता. सर्दी, खोकल्याची समस्या होऊ शकते.

-व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे तुम्हाला प्रत्येकवेळी थकवा जाणवतो. जेव्हा शरीरात एनर्जीची कमतरता निर्माण होते तेव्हा मानसिक आरोग्य बिघडले जाते.

- Advertisement -

-डिप्रेशन, चिडचिड, स्ट्रेस असे संकेत दिसतात.

-केसगळती सुद्धा व्हिटॅमिन डी चे संकेत आहेत.

21 things to know about vitamin D | Vinmec

कशी दूर कराल ही समस्या
-तुम्ही माशांचे सेवन करू शकता. कारण यामध्ये व्हिटॅमिन डी चा उत्तम स्रोत असतो. साल्मन आणि टूना सारखे मासे आठवड्यातून एकदा खा.

-अंड्याच्या पिवळ्या भागाचे सेवन करावे. यामध्ये सुद्धा भरपूर व्हिटॅमिन डी असते.

-संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढली जाऊ शकते.


हेही वाचा- आयुर्वेदातील ‘हे’ हर्ब्स दातांसाठी ठरतील फायदेशीर

- Advertisment -

Manini