Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthMonsoon: पावसाळ्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता अशी करा पूर्ण

Monsoon: पावसाळ्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता अशी करा पूर्ण

Subscribe

सुर्याच्या कोवळ्या किरणांमधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते. त्यामुळे नेहमी सकाळी वॉकला जावे किंवा त्याच्या किरणांच्या सान्निध्यात व्यायाम करावा असे सांगितले जाते. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. अशातच सुर्याच्या किरणांच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी ची पुर्तता होणे शक्य नाही. अशातच पावसाळ्यात कशी व्हिटॅमिन डी ची शरिरातील कमतरता भरुन काढावी याच बद्दलच्या काही टीप्स आपण पाहणार आहोत. (Vitamin D)

-डाएट

- Advertisement -


तुम्हाला डाएटच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी मिळू शकते. त्यासाठी तुमच्या डाएटमध्ये अंड्याचा पिवळा गर, पनीर, मशरुमचा समावेश करा. काही खाद्य पदार्थ सुद्धा व्हिटॅमिन डी युक्त असतात. जसे की, गाईचे दूध, संत्र आणि दही.

-सप्लीमेंट

- Advertisement -


जर व्हिटॅमिन डी ची कमतरता भरुन काढायची असेल तर तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता. मात्र हे सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

-काय काळजी घ्याल
काही लोक सप्लिमेंट बद्दल अधिक जाणून न घेताच खातात. मात्र तुमच्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे की नाही हे पाहिले पाहिजे. यासाठी रक्त तपासणी करुन घेणे महत्त्वाचे आहे. जर व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स खाऊ शकता.

तसेच अत्याधिक प्रमाणात व्हिटॅमिन डी चे सेवन केल्याने आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. रक्तात व्हिटॅमिन डी चा स्तर अधिक झाल्यास उलटी होणे, मळमळ, भूक न लागणे, डिहाइड्रेशन, स्नायू दुखणे, वारंवार लघवीला होणे, मुतखडा होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरिरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर डॉक्टरांना जरुर भेटा.


हेही वाचा- नको जिम नको व्यायाम फक्त असा ठेवा डाएट

 

- Advertisment -

Manini