Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीHealth Tips : जीवनसत्व डी शरीरासाठी उत्तम

Health Tips : जीवनसत्व डी शरीरासाठी उत्तम

Subscribe

व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे जीवनसत्व आहे. या जीवनसत्त्व डीच्या कमतरतेमुळे हाड ठिसूळ होतात , स्नायू दुखणे, आणि प्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हे व्हिटॅमिन शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. आज आपण जाणून घेऊयात जीवनसत्व डी शरीरासाठी कसे उत्तम आहे.

जीवनसत्व डी च्या कमतरतेची लक्षणे

  • हाडे ठिसूळ होणे
  • वारंवार सर्दी-खोकला होणे
  • थकवा आणि अशक्तपणा
  • स्नायूंमध्ये वेदना किंवा गुडघेदुखी
  • मानसिक तणाव आणि नैराश्य

जीवनसत्व डी कसे कमी होते

पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे

Vitamin D is good for the bodyआपल्या आरोग्यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत गरजेचा असतो. जर तुम्हाला सूर्यप्रकाशात मिळत नसेल तर आरोग्याशी निगडित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सूर्यप्रकाशाची कमतरता निर्माण झाल्यास सेरोटोनिन हार्मोनची पातळी कमी होऊन नैराश्य वाढू शकते.

आहारात व्हिटॅमिन डी ची कमतरता

Vitamin D is good for the bodyआहारात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण झाल्यास हाड कमकुवत होतात स्नायू आणि हाडांमध्ये वेदना होणे, केस गळणे थकवा किंवा नैराश्य इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.

गर्भधारणा

vitamin d is good for body गर्भधारणेदरम्यान व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्यास हाडे ठिसूळ होणे , लहान मुलांमध्ये चिडचिड, केस गळणे इत्यादी समस्या निर्माण होतात.

व्हिटॅमिन डी कसे वाढवावे?

सूर्यप्रकाश

vitamin d is good for body सूर्यप्रकाशामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. त्यामुळे सकाळी 7 ते 10 दरम्यान 15-30 मिनिटे उन्हात बसणे फायदेशीर आहे. तुम्हाला कोणतेही आजार होणार नाही.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

vitamin d is good for body दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. दूध हा व्हिटॅमिन डीचा एक उत्तम, नैसर्गिक स्रोत आहे. विविध प्राण्यांच्या दुधात व्हिटॅमिन डीचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे दूध दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचं सेवन तुम्ही करू शकतात.

फळांचा समावेश

vitamin d is good for body तुमच्या आहारात फळांचा समावेश करा फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. रोजच्या आहारात केळी, किवी, पपई, संत्री यांसारख्या फळांचा समावेश करा. अंजीर हे फळ डी, सी, ए आणि बी जीवनसत्त्वे समृद्ध आहे.

पालेभाज्या

Leafy vegetablesहिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. जे हाडे मजबूत करायला मदत करतात. पालकमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते.

हेही वाचा : Health Tips : रिकाम्यापोटी हे पदार्थ खाणे टाळा


Edited By : Prachi Manjrekar

Manini