स्किन केअर करण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रोडक्ट्स वापरतो. मात्र तुम्ही नैसर्गिक पद्धतीने स्किन केअर करू शकता. अशातच बहुतांशजण व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करतात. कारण यामध्ये अँन्टी-ऑक्सिडेट असल्याने स्किनला युवी किरणांपासून दूर ठेवते. त्याचसोबत स्किनला मॉइश्चाराइज सुद्धा होते. त्यामुळे त्वचा मऊ आणि ग्लो होते. चेहऱ्याला व्हिटॅमिन ई-कॅप्सूल लावताना पुढील काही टीप्स जरूर फॉलो करा.
चेहरा स्वच्छ धुवा
व्हिटॅमिन ई-कॅप्सूल चेहऱ्याला लावण्यापूर्वी तो स्वच्छ धुवा. जेणेकरुन चेहऱ्यावरील तेल आणि घाण निघून जाईल.
पॅच टेस्ट करा
व्हिटॅमिन ई ऑइल स्किनला अधिक लाभ पोहचवते. मात्र गरजेचे नाही की, प्रत्येक स्किनला सूट होईल. यासाठी अत्यंत गरजेचे आहे की, स्किनच्या एका लहानश्या भागात पॅच टेस्ट जरुर करा.
अधिक प्रमाणात लावू नका
व्हिटॅमिन ई तुमच्या स्किनसाठी अत्यंत फायदेशीर असते. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही अधिक प्रमाणात ते वापराल. त्याचा अधिक वापर केल्यास त्वचा तेलकट आणि चिकट होते.
रात्री करा अप्लाय
व्हिटॅमिन ई ऑइल तुम्ही सकाळी किंवा रात्री लावू शकता. मात्र रात्रीच्या वेळी लावणे उत्तम मानले जाते. झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन ई ऑइल आपल्या स्किनला लावू शकतात. यामुळे तेल स्किनमधून अब्जॉर्ब होण्यासाठी वेळ मिळतो.
हेही वाचा- कॉम्बिनेशन स्किनची अशी घ्या काळजी