व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये अँटिऑक्सिडेंटचे गुणधर्म असतात. हे आपल्या केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते. त्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल उत्तम आहे. आज आपण जाणून घेऊयात व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहे.
त्वचेला मॉइश्चरायझ करते
व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म असतात जे चेहऱ्याला मॉइश्चरायझ करायला मदत करते.
मुरुम आणि डाग
व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये अँटिऑक्सिडेंटचे आणि पोषक गुणधर्म असल्यामुळे हे मुरुम आणि डाग सुरकुत्या चेहऱ्यावरील छिद्रे कमी करायला मदत करते.
डाग आणि ब्रेकआउट्स कमी करते
जर मुरूमांचे डाग किंवा काळपटपणा दूर होत नसेल तर तुम्ही व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरू शकता. हे मुरूमांचे डाग आणि काळपटपणा दूर करण्यास खूप उपयुक्त आहे.
सनबर्नपासून संरक्षण
बऱ्याच लोकांना सनबर्नचा त्रास असतो. अशावेळी व्हिटॅमिन ई कॅप्सूल खूप उत्तम आहे. या कॅप्सूलमुळे सनबर्न दूर होते. आपली त्वचा देखील चांगली राहते.
त्वचेचा कोरडेपणा कमी होतो
व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. त्यामुळे चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या देखील कमी होतात आणि आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसते.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्याला लावताना या चुका करू नका
- व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर जास्त प्रमाणात लावू नये.
- या कॅप्सूलचा अतिवापर आपल्या चेहऱ्यासाठी घातक ठरू शकते.
- जर तुम्हाला त्वचेचे कोणते आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या कॅप्सूलचा वापर करा
- या व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी नीट तपासून घ्या
व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा?
- व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
- व्हिटॅमिन ई कॅप्सूल थेट चेहऱ्यावर लावता येते.
- जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून चेहऱ्याला लावा.
- फेस मास्क म्हणूनही व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर केला जातो.
हेही वाचा : Beauty Tips : टोमॅटो त्वचेसाठी फायदेशीर
Edited By : Prachi Manjrekar