Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'या' Vitaminsच्या कमतरतेमुळे पडू शकतात पायांच्या टाचांना भेगा

‘या’ Vitaminsच्या कमतरतेमुळे पडू शकतात पायांच्या टाचांना भेगा

Subscribe

टामिन्सची कमतरता किंवा शरीरातील असंतुलित हार्मोन्समुळेही पायाच्या टाचांना भेगा पडू शकतात

सतत पाण्यात काम करणाऱ्या महिलांना भेडसावणारा एक प्रश्न म्हणजे पायाच्या टाचांना पडणाऱ्या भेगा. या समस्येला अनेक महिला किंवा मुलींना सामोरे जावे लागते. बऱ्याच जणांचा असा समज असतो की योग्य स्किन केअर रुटीन नसल्यामुळे टाचांना भेगा पडतात किंवा पायाची त्वचा कोरडी पडल्यामुळे टाचांना भेगा पडतात. परंतु पायांच्या टाचांना भेगा पडण्यामागचे कारण हे व्हिटामिन्सची कमतरता ही असू शकते. व्हिटामिन्सची कमतरता किंवा शरीरातील असंतुलित हार्मोन्समुळेही पायाच्या टाचांना भेगा पडू शकतात,असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. (vitamins deficiency can crack heel)

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आपली त्वचा कोरडी पडते त्वचेतील ओलावा कमी झाल्याने त्वचेला भेगा पडू शकतात. शरीरात व्हिटामिन बी ३ , व्हिटामिन ई आणि व्हिटामिन सीची कमतरता असल्यास पायांच्या टाचांना भेगा पडू शकतात. शरीरात व्हिटामिन सी आणि बी३ च्या कमतरतेमुळे त्वचा क्रॅक होण्यास सुरुवात होते. त्यामुळे चांगल्या त्वचेसाठी शरीरात  व्हिटामिन्स योग्य प्रमाणत असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या त्वचेला प्रोटेक्शन मिळते. बऱ्याचदा खनिज,झिंक आणि ओमेगा ३ फॅटी अँसिडच्या कमतरतेमुळे देखील त्वचा कोरडी पडू शकते असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
तसेच असंतुलित हार्मोन्समुळेही ही समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या गंभीर असेल तर पायांच्या टाचेमधून रक्तही येण्याची शक्यता असते.

पायांच्या टाचा फाटल्यास काय करावे?

  • टाचा फाटल्यास त्यात घाण जमा होणार नाही याकडे लक्ष द्या. घाण जमा झाल्यास ती वेळेवर साफ करणे महत्त्वाचे आहे.
  • पायांना दररोज मॉइस्चरायझर किंवा तेल लावावे. त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही.
  • पाय २० मिनिटे कोमट पाण्यात ठेवा,त्यानंतर स्वच्छ करा यानेही तुम्हाला आराम मिळेल.
  • व्हिटामिन्सची कमतरता दूर करण्यासाठी योग्य संतुलित आहार घ्या.

    - Advertisement -

    हेही वाचा – झटपट करा केळी आणि सफरचंदाची स्मुदी

 

- Advertisement -
- Advertisement -
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -