Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthएक्सरसाइज करताना उलटी होते? करा 'हे' उपाय

एक्सरसाइज करताना उलटी होते? करा ‘हे’ उपाय

Subscribe

एक्सरसाइज केल्याने आपल्या शरीरातील उर्जा खर्च होतेच आणि त्याचसोबत थकवा ही येतो. थकवा आल्यानंतर बहुतांशवेळा मळमळल्यासारखे होते. या व्यतिरिक्त काहींना एक्सरसाइज केल्यानंतर किंवा अधिक एक्सरसाइज केल्याने उलटी होत असल्यासारखे वाटते. व्यक्तीमध्ये छातीत जळजळ, अॅसिड रिफ्लक्स आणि ढेकर येणे अशी लक्षणे सुद्धा दिसून येऊ शकतात. रनर्ससुद्धा बद्धकोष्ठता, पोट फुगणे अशाकाही गॅस्ट्रो इंटेसटिनल लक्षणांनी पीडित होऊ शकतात. या व्यतिरिक्त खुप जेवल्याने व्यायाम केल्यास जीआय सिस्टिममधून रक्ताचा पुरवठा डेविएट होतो. त्यामुळे मळमळ आणि उलटी होते. एक्सरसाइजसह खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्यास या लक्षणांपासून दूर राहता येऊ शकते.

हेल्थ एक्सपर्ट्सनुसार शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन कायम ठेवणे आणि त्याला हाइड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. एथलिट लोकांना तुम्ही पाहिले असेल की, ते मैदानात असताना अथवा व्यावसायिक रुपात उपलब्ध असलेले इलेक्ट्रोलाइट्स किंवा गेटोरेड जसे एनर्जी ड्रिंक्स पित राहतात. परंतु काहीवेळेस यामध्ये सुद्धा साखरेचे प्रमाण अधिक असते. अशातच अत्याधिक शुगर प्रोडक्ट्सही उलटीचे कारण ठरू शकतात.

- Advertisement -

वर्कआउटदरम्यान किंवा नंतर उलटीच्या समस्येपासून असे रहा दूर
-अत्याधिक फूड खाणे टाळा
एक्सरसाइजमुळे उलटी-मळमळ सारख्या लक्षणांपासून दूर राहण्यासाठी सोप्पा उपाय म्हणजे व्यायाम करण्यापूर्वी अत्याधिक फूड खाणे टाळा. एथलीट खासकरून रनर टूर्नामेंट किंवा मॅराथॉनच्या एक दिवस आधी आपल्या आहारत अधिक प्रमाणात कार्बोहाइडेट घेतात. याला कार्ब-लोडिंग असे म्हटले जाते.

-तुमच्यासाठी काय योग्य आहे हे समजून घ्या
अत्याधिक व्यायामापूर्वी याचा विचार करा की, तो केल्यानंतर खुप भूक लागू शकते. काही लोक व्यायामापूर्वी घेतल्या जाणाऱ्या आहारात प्रोटीन आणि कार्बोहाइडच्या मिश्रणाचा वापर करण्याचा सल्ला देतात. काही लोक केळ्याच्या रुपात हाय पोटॅशिअमचे सेवन करण्याचा सल्ला देतात. विविध लोकांमध्ये आहाराची आवश्यकता वेगवेगळी असते. आहाराची योजना व्यक्तीच्या शरीर आणि शारिरीक हालचाल आमि व्यायामाच्या प्रकारानुसार असली पाहिजे.

- Advertisement -

-डिहाइड्रेटिंग ड्रिंक्सपासून दूर रहावे
हैवी वर्कआउट करणार असाल तर आदल्यादिवशी रात्री किंवा व्यायाम केल्यानंतर लगेच दारू, कॅफेन सारखे डिहाइड्रेटिंग ड्रिंक किंवा धुम्रपान करण्यापासून दूर रहा. अत्याधिक प्रमाणात कॅफेनचे सेवन केल्याने परफॉर्मेंन्सवरही परिणाम होऊ शकतो.


हेही वाचा- हाता-पायांना मुंग्या येत असतील तर करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini