घरलाईफस्टाईलVomiting In Travelling : तुम्हाला प्रवासात उलटीचा त्रास होतो का? मग करा...

Vomiting In Travelling : तुम्हाला प्रवासात उलटीचा त्रास होतो का? मग करा हे उपाय

Subscribe

आपल्यापैकी अनेकांना प्रवासामध्ये उल्टी होणे किंवा अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक जण लांबचा प्रवास करण्याचं टाळतात.

अनेकांना प्रवासादरम्यान उलटीचा त्रास होतो किंवा मळमळल्यासारखे होते. आपल्यापैकी अनेकांना प्रवासामध्ये उल्टी होणे किंवा अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक जण लांबचा प्रवास करण्याचं टाळतात. परंतु तुम्ही जर प्रवासात या गोष्टी स्वतःबरोबर ठेवल्या तर तुम्हाला प्रवासात कोणताही त्रास होणार नाही.

प्रवासात उलटी होऊ नये म्हणून काही घरगुती उपाय

- Advertisement -

१. आलं


आल्यामध्ये असे काही गुण असतात ज्याने मळमळण्याचा त्रास होत नाही. आलं पोटातील जळजळ लगेच कमी करतो. त्यामुळे प्रवासा दरम्यान आल्याचा चहा, आल्याचा काढा प्यावा जेणेकरून उलटीचा त्रास होणार नाही, शिवाय आल्याचा एखादा तुकडा तुमच्या सोबत ठेवा.

- Advertisement -

२. लिंबू


जर तुम्हाला प्रवासात सारखी उलटी होत असेल तर, तुम्ही तुमच्या सोबत लिंबू नक्की ठेवा. लिंबामुळे तुम्हाला उलटी किंवा मळमळण्याचा त्रास होणार नाही. तसेच प्रवासादरम्यान तुमच्यासोबत गरम पाणीसुद्धा ठेवा, जेव्हा तुम्हाला मळमळण्याचा त्रास होईल, तेव्हा गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ मिसळून प्या. या उपायामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

३. पुदिना


प्रवासात पुदिना तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो, पुदिन्यामुळे पोटामध्ये गारवा तयार होतो. तुम्हाला हवं तर तुम्ही पुदिन्याची गोळी किंवा पुदिना सरबत पिऊ शकता.

४. केळी


केळी पोटॅशियमला रिस्टोर करण्यासाठी मदत करतात, याशिवाय केळी खाल्ल्याने बऱ्यापैकी उलटीचा त्रास कमी होतो. त्यामुळे तुम्ही जर लांबच्या प्रवासासाठी जात असाल तर तुम्ही तुमच्यासोबत केळी ठेवा.

५. आवळा


आवळा चवीला तुरट असतो, परंतु प्रवासात तुम्हाला मळमळण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता. शिवाय तुम्ही आवळा कॅन्डी किंवा आवळ्याचा रस पिऊ शकता.


हेही वाचा : Summer Tips-हॉट उन्हात घ्या कूल कूल कलिंगड आणि कोकम स्मूदीचा स्वाद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -