मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यातून प्रत्येक स्त्रीला जावे लागते. या काळात शरीरात अनेक प्रकारचे बदल घडतात. मानसिक बदल देखील होतात, जे कधीकधी आव्हानात्मक असू शकतात. अशा परिस्थितीत, चालणे हे खूप महत्त्वाचे असते. आज आपण जाणून घेऊयात, मेनोपॉज दरम्यान चालण्याचे जबरदस्त फायदे
वजन नियंत्रित राहते
मेनोपॉज दरम्यान हार्मोनल बदलांमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. चालण्यामुळे कॅलरी बर्न होतात आणि वजन संतुलित ठेवण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य सुधारते
मेनोपॉज नंतर हृदयविकाराचा धोका वाढतो. चालणे हा एक प्रकारचा व्यायाम आहे, जे रक्तदाब कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
हाडे आणि सांधे मजबूत होतात
मेनोपॉज दरम्यान हाडे ठिसूळ होतात. चालण्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि सांध्यांची लवचिकता टिकून राहते.
मानसिक स्वास्थ्य सुधारते
मेनोपॉजमुळे ताण, चिंता, आणि मूड स्विंग्स येऊ शकतात. चालल्याने “एंडोर्फिन्स” नावाचे आनंददायक हार्मोन शरीरात सोडले जातात, ज्यामुळे मनःशांती लाभते.
चांगली झोप लागते
मेनोपॉज दरम्यान झोपेचे विकार होऊ शकतात. नियमित चालल्याने शरीर थकते आणि झोप देखील चांगली लागते.
मधुमेहचा धोका कमी होतो
चालण्यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रित राहते, जे विशेषतः मधुमेह असलेल्या महिलांसाठी फायदेशीर ठरते.
पचनक्रिया सुधारते
चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते, जे मेनोपॉजच्या काळात होणारी सामान्य समस्या आहे.
जीवनशैली चांगली होते
नियमित चालल्याने शरीर सक्रिय राहते आणि थकवा कमी होतो, ज्यामुळे महिला अधिक ऊर्जावान वाटतात. मेनोपॉज दरम्यान चालणे एक सोपे आणि फायदेशीर व्यायाम आहे, जे महिलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्यासाठी फायदेशीर आहे. हेही पाहा –
Edited By – Prachi manjarkar