Wednesday, February 21, 2024
घरमानिनीHealthनैसर्गिकरित्या वजन वाढवायचंय? तूप आणि गुळाचे करा सेवन

नैसर्गिकरित्या वजन वाढवायचंय? तूप आणि गुळाचे करा सेवन

Subscribe

आपल्या प्रत्येकाच्या शरीरात कोणत्या ना कोणत्या कॅल्शियमची कमतरता असते. जर तुम्हाला नैसर्गिकरित्या वजन वाढवचं असेल तर तुमच्या नियमीत आहारात गुळ आणि तूपाचे सेवन होणं गरेजचं आहे. अनेकांना गुळ, तूप आवडत नाही अशावेळी तुम्ही तूपा आणि गुळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. खरं तर, गुळ आणि तूप आपल्या आरोग्यासाठी उत्तम असून याचा शरीरावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही.

तूप खाण्याचे फायदे

What ghee is and why you should cook with it

- Advertisement -

तूपामुळे नैसर्गिकरित्या वजन वाढते. तूप हे गोड आहे तसेच शरीरासाठी थंड देखील आहे. यामुळे शरीरातील वात आणि पित्त शांत होते. तूप सेवन केल्याने पचन सुधारते.तूपामधल्या पोषक घटकांनी स्नायू मजबूत होतात. तसेच स्मरणशक्ती, केस, त्वचा, प्रजनन क्षमता, बुद्धिमत्ता सुधारते.

गुळ खाण्याचे फायदे

ALL ABOUT JAGGERY — Jasmine Hemsley

- Advertisement -

गुळ हे निरोगी गोड पदार्थ असून तो पांढर्‍या साखरेपेक्षा उत्तम आहे. चवीला गोड असल्यामुळे याने पित्ताचा त्रास होत नाही. याच्या सेवनाने प्रतिकारशक्ती सुधारण्यास देखील मदत होते.गुळाचा चहा देखील तुमच्या आरोग्यासाठी एक उत्तम स्रोत आहे. कोरडे आले आणि काळी मिरी या सोबत गुळ घेतल्यास श्वसनाच्या समस्या दूर होतात.

वजन वाढवण्यासाठी तूपाचे आणि गुळ एकत्र खा

वजन वाढण्यासाठी आणि अशक्तपणासाठी गुळ आणि तूप सम प्रमाणात घ्या .यामुळे तुमच्या शरीराला शक्ती आणि ऊर्जा मिळेल. गुळ आणि तूप खाण्याचा सर्वोत्तम मार्ग जेवणानंतर आहे. यासाठी 1 चमचा देशी गाईचे तूप आणि 1 चमचा गुळ घ्या आणि एकत्र मिक्स करु खा. हे सलग तुम्ही 2 आठवडे नियमित घेत राहिलात तर तुमच्या वजनात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

 


हेही वाचा :

हृदय आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

- Advertisment -

Manini