घरलाईफस्टाईलपोटाची चरबी कमी करायची आहे ? आहारात 'या' ५ फळांचा समावेश ठरेल...

पोटाची चरबी कमी करायची आहे ? आहारात ‘या’ ५ फळांचा समावेश ठरेल असरदार

Subscribe

शरीराच्या वाढत्या वजनामुळे प्रत्येक व्यक्ती चिंतित असतो. याचा परिणाम त्याच्या शारीरिक तसेच मानसिकतेवर होत असतो. आपले शरीर,आरोग्य सुदृढ  राहावे यासाठी प्रत्येक व्यक्ती भरघोस पैसा आणि वेळ जीम मध्ये ,महागतल्या डाएट वर तसेच बाजारात मिळणार्‍या नकली प्रॉडक्ट वर खर्ची घालतो. विविध प्रकारच्या प्रोटीन पाऊडर,प्रोटीन शेक,डाएट ज्यूस यावर खर्च करण्यापेक्षा अनेक नैसर्गिक फळांपासून आपण आपल्या शरीरातील वाढलेली चरबी कमी करू शकतो. आपल्या पोटाभोवती वाढलेल्या चरबीला कमी करण्यासाठी कोणती फळे अत्यंत उपयुक्त आहेत जाणून घेऊयात

- Advertisement -

सफरचंद : सफरचंद बाजारात अगदी सहजरित्या मिळणार्‍या फळांपैकी आहे. हे फळ ‌‌‌वजन कमी करण्यास सहाय्यक तर आहे. तुम्हाला काही उपाय सूचत नाही तर तुम्ही रोज 2 सफरचंदाचे सेवन करायला सुरुवात केली पाहिजे ज्या मुळे तुमच्या पोटाची चरबी हळू हळू कमी होण्यास मदत होईल. हे वैज्ञानिक संशोधांनमध्येही प्रमाणित झाले आहे.यात फाइबर, फ्लेवोनोइड्स आणि बीटा कैरोटीन सारखे गुणधर्म सापडले आहेत जे आपल्या शरीरसाठी अत्यंत लाभदायक ठरते.


संत्री-संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए तसेच विविध फ्लेव्होनॉइड सामुग्रीसह अल्कोहोल आणि बीटा कॅरोटीन, बीटा क्रिप्टोक्सॅनथिन, झा-झांथी व ल्यूटन यांचा समावेश असतो. याची खास गोष्ट अशी आहे की यामध्ये झीरो फॅट आणि कमी कॅलरी,अॅंटीऑक्सीडेंट हे वजन कमी कण्यास मदत करते.

- Advertisement -

कलिंगड- वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा डाएटमध्ये जरूर समावेश करावा. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात. मात्र अधिक काळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. कलिंगडामध्ये सोडियम, कार्बोहायड्रेट ,फायबर,प्रोटीन आणि विटामीन अ,क यांच्या मुळे पोटाचा घेर हळू हळू कमी होऊ शकतो.

स्ट्रॉबेरी- स्ट्राॅबेरीत फायबर मोठया प्रमाणात आढळतं एंथोसायनिन हे लाल रंगाचे अॅंटीआॅक्सीडंट देखील स्ट्राॅबेरीत सापडतं यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते या सर्वोत्तम फळात नाईट्रेट देखील आहे जे शरीरात आॅक्सीजनचे प्रमाण वाढवते शरीरातील रक्तप्रवाहाच्या गतीला विकसीत करतं ज्याने शरीराची वाढलेली आतरिक्त चरबी सहज कमी होते.

अननस- पोटाच्या चरबी पासून त्वरित सुटकरा मिळण्यासाठी अननस खाऊ शकतात. यात फायबर असल्या कारणामुळे खूप काळ पोट भरलेलं असल्याची जाणीव होते. अननसात ब आणि जास्त प्रमाणात क ही जीवनसत्त्वे असतात.


हे हि वाचा – सावधान ! एनर्जी ड्रिंक पिण्यास बेतू शकते जिवावर, संशोधनातील निष्कर्ष

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -