Nutrition Tips: ब्रँडी, रम नाही तर ‘हे’ पेय ठेवेल हिवाळ्यात शरीर उष्ण

want to stay warm in winters ditch brandy or rum and have water instead
Nutrition Tips: ब्रँडी, रम नाही तर 'हे' पेय ठेवेल हिवाळ्यात शरीर उष्ण

बरेच लोकं हिवाळ्याच्या दिवसात पाणी कमी पितात, त्यांना असे वाटते की, हिवाळ्यात शरीराला पाण्याची आवश्यकता खूप कमी असते. कारण यादरम्यान शरीराला घाम येत नाही. परंतु ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. यामुळे हिवाळ्याच्या दिवसात अपचन होण्याचा धोका अधिक वाटतो. एवढेच नाही तर आपण जर पुरेसे पाणी प्यायले नाही तर यामुळे शरीरातील कार्यात बाधा निर्माण होण्यास सुरुवात होते. तसेच जेव्हा आपण कमी पाणी पितो तर आवश्यकतेपेक्षा जास्त जेवतो. हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी असते आणि या काळात आपण जास्त कपडे घालतो. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त भार जाणवतो आणि म्हणून ऊर्जेची कमतरता, आळसही जाणवू लागतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात पाणी प्या. पाणी आपल्या शरीरा उष्ण ठेवण्यास मदत करते.

न्यूट्रिशनिस्ट पूजा मखीजाने आपल्या सोशल मीडियावर सांगितले की, हिवाळ्याच्या दिवसात स्वतःला गरम ठेवण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे पाणी पिणे. हिवाळ्याच्या दिवसात जेव्हा आपण पाणी कमी पितो, तेव्हा शरीराचे तापमान कमी होऊ लागते. यामुळे हायपोर्थमियची समस्या होऊ लागते. ही अशी एक समस्या आहे, ज्यात शरीरात जेवढ्या वेगाने गरमी निर्माण करते, त्यापेक्षा अधिक वेगाने गरमी गमावते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीर उष्ण ठेवण्यासाठी अधिक पाणी प्या. कारण जेवढे तुम्ही पर्याप्त मात्रेत पाणी पिता, त्यामुळे रक्त प्रवास संतुलित राहते. तसेच पाण्याच्या कमीमुळे रक्ताचा प्रवाह मंदावतो. ज्यामुळे शरीराचे तापमान कमी होऊ लागते आणि यामुळे हायपोर्थमिया समस्या निर्माण होते.

अल्कोहल शरीराला उष्ण ठेवते?

दारुमुळे शरीर उष्ण राहते, अशी लोकं मानतात. परंतु पूजा मखीजांनी सांगितले की, असे करणे चुकीचे आहे. रम किंवा व्हिस्की तुमच्या शरीराला काही काळासाठी गरम ठेवते. परंतु त्यानंतर शरीरातील तापमान कमी होऊ लागते. तसेच दारुमुळे आपल्यात थरथरण्याची क्षमता प्रभावित होते. शरीरात थंडी वाटते आणि गरम हवेची आवश्यकता भासते.


हेही वाचा – Winter Tips For Kids : थंडीपासून लहान मुलांचा कसा बचाव कराल? या आहेत टीप्स