अनेकदा आपल्या शरीरावर चामखीळ येतात. शरीराच्या कोणत्याही भागात चामखीळ दिसल्यास तो भाग कुरूप दिसू लागतो. अनेकदा मानेवर, हातावर, पाठीवर आणि गालावर चामखीळ दिसतात, पण काही वेळा चेहऱ्यावरही चामखीळ दिसू लागतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात फरक पडू शकतो. त्वचेवर चामखीळ का दिसतात हे तुम्हाला माहिती आहे का? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या विषाणूमुळे हे चामखीळ येतात. काही चामखीळ हे अनुवांशिक असतात तर काही सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कामुळे होतात. अनेकदा त्वचारोगतज्ज्ञ चामखीळ घालवण्यासाठी सर्जरी करण्याचा सल्ला देतात. परंतु असे करणे थोडे खर्चीक ठरू शकते. जर तुम्हालाही या चामखीळांचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही या नको असलेल्या चामखीळांपासून मुक्ती मिळवू शकता. जाणून घेऊयात चामखीळ दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरतील.
लसूण :
लसणाची पाकळी सोलून घ्या आणि सोललेली लसूण चामखिळीच्या भागावर लावा. चामखीळांवर लसूण चोळल्याने चामखीळ सुकते आणि चामखीळ आपोआप गळतात.
कांद्याचा रस :
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर चामखिळांचा त्रास होत असेल तर तुम्ही कांद्याचा रस वापरून चामखीळ काढू शकता. कांदा मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्या आणि कांद्याचा रस काढा. हा रस रोज चामखिळांवर लावल्याने चामखीळ आपोआप गळून पडतील.
बटाट्याचा रस :
बटाट्याचा रस देखील चामखीळ दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. यासाठी बटाट्याचा तुकडा घेऊन चामखीळांवर हलके चोळा. असे केल्याने चामखीळ सुकतात आणि 3-4 दिवसात पडू लागतात.
वडाच्या पानांचा रस :
वडाच्या पानांनीही चामखीळांवर उपचार करणे शक्य आहे. वडाची पाने बारीक करून त्याचा रस काढा. ते लावल्याने चामखीळाच्या आजूबाजूची त्वचा मऊ होते. तसेच, चामखीळ सुकतात आणि स्वतःच पडतात.
स्ट्रॉबेरी :
लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारी स्ट्रॉबेरी चामखीळांचा नायनाट करण्यासाठीही तेवढीच प्रभावशाली आहे. यासाठी स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून चामखीळांच्या जागेस चोळून लावावे. नियमित केल्यास चामखीळ आपोआप निघून जाते.
हेही वाचा : Religious Tips : तुळस मंजिरी देवघरात का ठेवावी ?
Edited By – Tanvi Gundaye