वॉशिंग मशीन ही प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वॉशिंग मशीनने कपडे धुणे सगळ्यांनाच सोयीस्कर जाते. कपडे धुण्यासारखं अवघड आणि अंगमेहनतीचं काम वॉशिंग मशीनमुळे सोपे झाले आहे. मात्र, याच वॉशिंग मशीनचा प्रमाणाबाहेर वापर केल्यास त्याचे दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे दररोज किती वेळासाठी वॉशिंग मशीन वापरणे योग्य आहे आणि त्याचा अति प्रमाणात वापर केल्याने काय होऊ शकते याविषयी आजच्या या लेखातून जाणून घेऊयात. वॉशिंग मशीनचा दिवसाला 1 तास वापर करणे योग्य आहे. दर दिवशी 1 तासाकरता वॉशिंग मशीन वापरल्यानंतर मशीनला आराम करण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. वॉशिंग मशीनला त्यात असलेल्या हीट रेजिस्टेंसला हॅंडल करण्यासाठी थोड्या आरामाची गरज असते. त्यामुळे जर तुम्हाला खूप कपडे धुवायचे असतील आणि मशीन दोन – तीन वेळा वापरण्याची गरज भासणार असेल तर प्रत्येक धुण्यानंतर प्रत्येकी 1 तास तरी वॉशिंग मशीनला आराम करू देणे गरजेचे आहे. तेव्हाच ती वॉशिंग मशीन योग्य पद्धतीने काम करू शकते, आणि कोणत्याही प्रकारच्या डॅमेजचा सिग्नल देत नाही.
वॉशिंग मशीनच्या अतिवापराचे नुकसान
1. मोटर ओव्हरहिट आणि जळण्याची शक्यता : वॉशिंग मशीनमध्ये असलेली मोटर सतत चालू ठेवली गेली तर ती गरम होऊ शकते आणि स्पार्क होऊ शकतो. 2. ड्रम बिघडू शकतो : ड्रम जर सतत फिरत राहिला तर त्याचे बेयररिंग्ज लवकर खराब होतात आणि मशीनमधून घरघर असा आवाज येऊ लागतो. 3. इलेक्ट्रिक पार्ट्स : मशीन जास्त वेळ सुरू राहिली तर त्यातील इलेक्ट्रॉनिक भाग अधिक तापतात. आणि हे पार्ट्स खराब होऊ शकतात. 4. वीज व पाण्याचा अपव्यय : भरपूर वेळासाठी मशीन वापरल्यास विजेचा आणि पाण्याचाही अतिप्रमाणात वापर केला जातो.
मशीनचे आयुष्य कसे वाढवाल ?
1. ओव्हरलोडिंग करू नका : मर्यादेपेक्षा जास्त कपडे मशीनमध्ये टाकल्यास मशीनवर दडपण येते. 2. एक तासासाठीच वापरावे : मशीनला आरामाची गरज असते. त्यामुळे एक ते दीड तासापेक्षा अधिक मशीनचा वापर करू नका. 3. सर्व्हिसिंग : मशीन नीट चालावी यासाठी 6 महिन्यांतून एकदा तरी वॉशिंग मशीनचे सर्व्हिसिंग करून घेणे गरजेचे आहे. 4. स्वच्छता : मशीनच्या अंतर्गत भागांची स्वच्छता नियमितपणे करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे योग्य पद्धतीने मशीनचा वापर केला तर मशीन दीर्घकाळासाठी साथ देऊ शकेल आणि कोणत्याही अडचणीशिवाय तिची कार्यक्षमता वाढू शकते. त्यामुळे मशीनचा योग्य आणि मर्यादित वापर करा. हेही वाचा : Chocolate Falooda Recipe : चॉकलेट फालूदा
Edited By – Tanvi Gundaye