आपण आपल्या आरोग्याप्रमाणे त्वचेची देखील खूप काळजी घेतो. बऱ्याचदा आपण चेहरा वारंवार धुवून देखील तो तेलकट किंवा चिकट दिसतो. यामागचं कारण म्हणजे अतिरिक्त ऑईल, हार्मोनल बदल, अयोग्य स्किनकेअर प्रॉडक्ट्स किंवा आहार यामुळे तेलकटपणा किंवा चिकटपणा जात नाही. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात कोणत्या टिप्स फॉलो केल्याने चेहऱ्यावरचा तेलकटपणा निघून जाईल.
योग्य फेसवॉश
नैसर्गिक गुणधर्म असलेले फेसवॉश वापरा. या फेसवॉशमुळे तुमचा तेलकटपणा आणि चिकटपणा दोन्ही त्वरितपणे निघून जाईल. दिवसातून फक्त २ वेळा चेहरा धुवा सकाळी किंवा झोपण्यापूर्वी जास्त वेळा धुतल्याने त्वचा जास्त तेल निर्माण करू शकते.
टोनर
ग्रीन टी किंवा विच हॅझलयुक्त टोनर चेहऱ्यावर लावा. हे त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित ठेवते. चेहऱ्यावर टोनर लावल्याने त्वचा सुंदर आणि ग्लोइंग दिसेल.
ऑइल-फ्री मॉइश्चरायझर
ऑइल-फ्री मॉइश्चरायझर वापरा याने तुमची त्वचा तेलकट होणार नाही. त्वचा खूप चांगली राहील.
फेस पॅक
आठवड्यातून २ वेळा मुलतानी माती गुलाबपाणी लावल्यास तेलकटपणा कमी होतो. ओट्स आणि मधाचा पॅक लावल्याने त्वचा मऊ राहते आणि अतिरिक्त तेलकाढले जाते.
मेकअप हलका ठेवा
मॅट फिनिश असलेले प्रोडक्ट्स निवडा. ब्लॉटिंग पेपर वापरून दिवसातून एक-दोन वेळा चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल पुसा.
आहारावर लक्ष द्या
तेलकट आणि जंक फूड कमी करा. भरपूर पाणी प्या आणि ताज्या फळभाज्या खा.
सनस्क्रीन
तेलकट त्वचेसाठी मॅट फिनिश किंवा जेल-बेस्ड सनस्क्रीन निवडा. हे सगळे उपाय नियमित केल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होईल आणि त्वचा फ्रेश दिसेल.
हेही वाचा : Sneezing In Morning : सकाळी उठल्यावर शिंका का येते?
Edited By : Prachi Manjrekar