Thursday, April 18, 2024
घरमानिनीBeautyचेहरा गरम पाण्याने धुतल्याने येईल अकाली वृद्धत्व

चेहरा गरम पाण्याने धुतल्याने येईल अकाली वृद्धत्व

Subscribe

सध्या हिवाळा सुरु असल्याने अनेकजण सकाळी थंड पाण्याने अंघोळ करायला घाबरतात. त्यामुळे या दिवसात अंघोळीसाठी गरम पाण्याचा जास्त वापर केला जातो. अंघोळ करता करता काहीजण चेहरा धुण्यासाठी देखील त्याच गरम पाण्याचा वापर करतात. परंतु हेल्द एक्सपर्ट्सच्या मते, गरम पाण्यामुळे आपली त्वचा खराब होते. गरम पाण्यामुळे आपल्या चेहऱ्यावराल आर्द्रता हिरावून घेतली जाते.

गरम पाण्याने चेहरा धुणं टाळा

Is It Better to Wash Your Face With Cold Water or Warm Water? - Benefits of  Cold Wash

- Advertisement -
  • तुम्ही चेहऱ्या धुण्यासाठी सतत गरम पाण्याचा वापर करत असाल तर यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते. कोरडेपणामुळे चेहऱ्याला खाज येते.
  • गरम पाण्यामुळे चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या येतात.
  • अनेकदा गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला संसर्ग होऊ शकतो.
  • गरम पाण्यामुळे त्वचेवर लालसरपणा येतो तसेच चेहऱ्यावरील चमक निघुन जाते.
  • गरम पाण्यामुळे रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते.
  • ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे त्यांनी देखील गरम पाण्याचा कधीही वापर करु नये.

थंड पाण्याने चेहरा धुवा

Should You Wash Your Face Twice a Day?

  • थंड पाण्याने आपला चेहरा धुतल्याने आपल्या त्वचेचा पोत सुधारतो. थंड पाण्यामुळे आपल्या त्वचेवरील पोर्स त्वचेला आकुंचित करतात. यामुळे आपला रक्त प्रवाह वाढून, अँटी एजिंग कमी होते. ज्यामुळे आपला चेहरा कायम चमकदार राहतो.
  • थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला आवश्यक असणारी आर्द्रता आणि लवचिकता कायम राहते. थंड पाण्याने चेहरा धुतल्यास किंवा आंघोळ केल्यास शरीरातील थकवा निघून जातो.
  • जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे असतील तर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुतल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. यामुळे चेहऱ्यावरील जळजळ किंवा सूज लक्षणीयरीत्या कमी होते.

हेही वाचा :

सदाबहार वनस्पतीच्या मदतीने ‘अशी’ चमकवा त्वचा

- Advertisment -

Manini