सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर धूप दिप लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मक उर्जा, गोष्टी घराबाहेर जातात आणि घरात शांतात, सौख्य, सकारात्मकता नांदण्यास सुरूवात होते. यासाठी बाजारातून विविध सुगंधी आणि महागडे धूप आणले जातात. पण, अनेकदा यातून हवा तसा सुगंध घरात दरवळत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही घरच्या घरी निर्माल्यातील फुलांपासून सुगंधी धूप बनवू शकता. या युक्तीने तुम्हाला अतिरीक्त खर्चही येणार नाही आणि निर्माल्याचा योग्य वापरही होईल.
घरात असणारे निर्माल्य आपण टाकून देतो. या उपायाने त्याचा पुर्नवापर होईल आणि देवासाठी त्याचा वापर केला जाईल. पाहूयात, घरच्या घरी निर्माल्यापासून सुगंधी धूप कसे बनवायचे,
साहित्य –
- झेंडूची फूले – 6 ते 7
- गुलाबाची फूले – 6 ते 7
- तमालपत्र – 1 ते 2
- कापूर
- तिळाचे तेल – 2 चमचे
- मध – 1 चमचा
- कोळसा, शेणाची काडी
- चंदन पावडर
- तूप – 2 ते 3 चमचे
धूप बनवण्याची कृती –
- धूप बनवण्यासाठी सगळ्यात आधी निर्माल्यातील सुकलेली फूले घ्यावीत.
- यानंतर तमालपत्र, कोळसा, शेणाची काडी, चंदन आणि घेवून त्याची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावीत.
- आता चाळणीतून गाळून पावडरमधील बारीक भूसा वेगळा करून घ्यावा.
- तयार पावडरमध्ये तूप, तिळाचे तेल, मध आणी थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यावे.
- पाणी घालताना एक गोष्ट लक्षात घ्या, पाणी जास्त घालू नये.
- सर्व साहित्य मिक्स केल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत.
- तुम्ही या गोळ्यांना हवा तो आकार देवू शकता.
- आकार दिल्यावर उन्हात वाळवून घ्या.
- उन्हात सुकल्यावर तुमच्या होममेड धूपाच्या काड्या वापरण्यासाठी तयार झाल्या आहेत.
तुम्ही झेंडू आणि गुलाबाऐवजी कोणत्याही सुवासिक फूलांचा वापर करू शकता. फक्त घरी धूप बनवताना एक काळजी घ्यावी, धूपाच्या काड्या उन्हात कडक वाळवून घ्याव्यात.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde