अनेकवेळा पाण्याची बॉटल कितीही स्वच्छ केली तरी त्यातून दुर्गंधी येतेच. खरं तर, बॉटलच्या तळाशी बॅक्टेरीया वाढतात आणि दुर्गंधीचे कारण बनतात. पाण्याच्या बॉटलमधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी आज आम्ही काही सोपे उपाय घेऊन आलो आहोत. ज्या उपायांमुळे बॉटलची दुर्गंधी दूर होईल. पाहूयात, रोजच्या वापरातील पाण्याच्या बॉटलमधून दुर्गंधी कशी दूर करायची.
गरम पाण्याने बॉटल धुवा –
उकळलेले पाणी बॅक्टेरिया आणि दुर्गधी दोन्ही दूर करण्यासाठी खूप प्रभावी उपाय मानला जातो. विशेष करून बॉटल जर धातूची असेल तर उकळलेल्या पाण्यानेच स्वच्छ करावी. यासाठी एक ग्लास पाणी बॉटलमध्ये भरा आणि बॉटल काही वेळ तशीच ठेवा. थोड्या वेळाने बॉटल स्वच्छ धुवून घ्या. याने बॉटलच्या दुर्गधीसह बॅक्टेरिया नष्ट होतील.
उन्हात ठेवणे –
पाण्याच्या बॉटलमधून सतत दुर्गधी येत असेल तर बॉटल स्वच्छ केल्यानंतर काहीवेळ उन्हात ठेवा. बॉटल उन्हात ठेवण्याचे कारण म्हणजे जंतूनाशक गुणधर्म असतात, जे बॅक्टेरिया नष्ट करतात. तुम्ही बॉटल कमीत कमी 1 तास उन्हात ठेवू शकता. ज्यामुळे पाण्याच्या बॉटलमधून दुर्गधी नाहीशी होईल.
सोडा टॅब्लेट –
सोडा टॅब्लेट या खास पाण्याची बॉटल स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जातात. यासाठी एक सोडा टॅब्लेट बॉटलमध्ये टाका आणि त्यात पाणी भरून ठेवा. सोडा टॅब्लेट पाण्यात विरघळेल आणि बॉटल स्वच्छ करेल.
टी ट्री ऑइल –
टी ट्री ऑइल अॅटी – बॅक्टेरियल आणि अॅटी- फंगल तेल आहे. या तेलाच्या वापरामुळे बॅक्टेरिया नष्ट होऊन दुर्गधी निघून जाते. यासाठी तुम्ही टी ट्री ऑइलचे काही थेंब पाणी मिक्स करा. आता तयार पाणी बॉटलमध्ये टाकल्यावर घुसळा आणि स्वच्छ पाण्याने बॉटल धुवून घ्या.
रोज स्वच्छ करा –
सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे पाण्याची बॉटल रोज स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही कोणतेही डिश वॉशर लिक्विड किंवा गरम पाण्याचा वापर करू शकता.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde