हिवाळ्यात बहूतेकजण आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात. पूर्वी बंब तापवून त्यात पाणी गरम केले जायचे. जसजसा काळ बदलत गेला तसे गिझर आणि हीटर रॉड बाजारात आले आणि त्याचा वापर सूरू झाला. गिझरपेक्षा हीटर रॉड वापरणे सोयीस्कर आणि त्याची किंमत कमी असल्याने सर्रासपणे घराघरात पाणी गरम करण्यासाठी त्याचा वापर होतो. पण, हीटर रॉडचे जसे फायदे आहेत तसे तोटेदेखील आहेत. जे गांभीर्याने न घेतल्यास घातक ठरू शकतात. दरवर्षी वॉटर हीटरचा शॉक लागून मृत्यु झालेले आपण पाहतो, त्यामुळे जाणून घेऊयात हीटर रॉड वापरताना कोणती काळजी घ्यावी.
या गोष्टी लक्षात घ्या –
- हलक्या दर्जाचा हीटर रॉड विकत घेऊ नये. हलक्या दर्जाचा हीटर रॉडमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे हीटर रॉड विकत घेताना उत्तम क्वॉलिटीचा घ्यावा.
- 2 ते 3 वर्षापेक्षा जास्त एकच हीटर रॉड वापरू नये. वापरत असाल तर एकदा इलेक्ट्रीशियन कडून तपासून घ्यावा. दुरुस्ती करायची गरज असेल तर करुन घ्यावी.
- पाणी गरम करताना रॉड पाण्यात टाकल्यावर सुरू करावा.
- तुम्ही जर हातात रॉड ठेवून स्वीच सुरू केल्यास शॉक लागण्याची शक्यता असते.
- पाणी गरम झाले की नाही हे तपासण्यासाठी पाण्यातून रॉड बाहेर काढून चेक करावे.
- हीटर रॉड बंद केल्यानंतर कमीतकमी 10 ते 20 सेंकदानंतर पाण्यातून बाहेर काढावा.
- स्टील किंवा लोखंडासारख्या भांड्यामध्ये हीटर रॉडच्या साहाय्याने पाणी गरम करू नये.
- हीटर रॉडने पाणी गरम करताना प्लास्टिकची बादली वापरावी.
- हीटर रॉड पाण्यात पूर्णपणे बुडल्याची खात्री करावी.
- वॉटर हीटर रॉड पाण्यात टाकल्यावर त्यात हात टाकणे चुकीचे आहे. यामुळे तुम्हाला शॉक लागू शकतो.
- अर्धी बादली पाण्यात हीटर रॉड टाकू नये.
- हीटर रॉड खराब झाला असेल तर त्याचा वापर करू नये.
हेही पाहा –