Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल ब्रेकअपनंतर डिप्रेशन मधून कसे बाहेर याल

ब्रेकअपनंतर डिप्रेशन मधून कसे बाहेर याल

Related Story

- Advertisement -

जागतिक आरोग्य विभागाने प्राकाशित केलेल्या अहवालानुसार जगभरातील ५ कोटी नागरिक हे डिप्रेशनमध्ये जीवन जगत आहेत. बहुसंख्य लोक हे डिप्रेशनमध्ये आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. यात प्रेमभंग झाल्याने डिप्रेशनमध्ये असनाऱ्या लोकांचा टक्का मोठा आहे. ब्रेकअप झाल्यानंतर अनेकजण डिप्रेशनमध्ये जातात यात तरुणांची संख्या जास्त आहे. या कारणासाठी अनेकदा मद्यसेवन करुन डिप्रेशन कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होतो व नकळत आयुष्य उद्ध्वस्त करुन ते आत्महत्येच्या वाटेवर चालू लागतात. चित्रपटांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम असल्यामुळे त्यातील ब्रेकअपच्या घटनेशी आपण जोडले जातो. नैराश्यामुळे अनेकदा करियरवर लक्ष केंद्रीत करता येत नसल्याने तुमच्या जीवनातील अमुल्य वेळ वाया जातो. यातून बाहेर येण्यासाठी पुढील उपाय नक्की वाचा.

Breakup
दुःख व्यक्त करण्यासाठी जवळच्या व्यक्तीला गाठा

- Advertisement -

दुःख व्यक्त करा

ब्रेकअपनंतर जर तुम्ही दुःखात असाल तर आपल्या जवळील व्यक्तीशी बोला. दुःख दाबून ठेवल्याने मनात घुसमट निर्माण होते. यावर उपाय म्हणून आपल्या जवळील लोकांशी संवाद साधने आवश्यक आहे. जर तुमच्याकडे असे कोणीही नसेल तर आपले दुःख एका डायरित लिहून काढा. या भावनांना सोशल मीडियावर व्यक्त करु नका. असे केल्यास सोशल मीडियावर असलेले तुमच्या बरोबर याच विषयावर चर्चा करतील. त्यामुळे पुन्हा तुम्ही त्याच विषयात अडकणार.

- Advertisement -

Breakup
फेसबुक वरुन अनफ्रेंड करा

आठवणींना नष्ट करा

ब्रेकअपनंतर तुमच्या साथीदाराच्या सर्व आठवणी नष्ट करा. अनेकजण ब्रेकअपनंतर फेसबुकवर फेक अकाऊंट बनवून आपल्या साथीदाराच्या अकाऊंटवरील पोस्ट बघतात. यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो मात्र नकळत आपण स्वःताचे मनही दुखावतो. साथीदारा निगडीत फोटो, व्हिडिओ, पत्र, कार्ड, भेटवस्तू फेकून द्या. साथीदाराशी संपर्क करण्याचे सर्व रस्ते बंद करा.

Breakup
नियमीत व्यायाम

व्यायाम करा

रिकाम्यावेळी तुम्हाला साथीदाराची आठवण येत असेल तर व्यायाम करणे हा उत्तम पर्याय आहे. व्यायामुळे शरीर सुधृढ बनते तसेच मनात नकारार्थी विचार ही येत नाहीत.

Breakup
मित्रांसोबत वेळ घालवा

मित्रांबरोबर वेळ घालवा

बऱ्याचदा ब्रेकअपनंतर आपण एकटे राहण्याचा प्रयत्न करतो. कोणालाही भेटण्याची इच्छा होत नाही. अशावेळी मित्रांबरोबर वेळ घालवने हा योग्य पर्याय आहे. मित्रांबरोबर फिरायला किंवा पिकनीकला गेल्यामुळे दुःख विसरण्यास मदत होते.

Breakup
कामाावर लक्ष केंद्रीत करा

कामावर फोकस करा

आयुष्यात मागे वळून बघायचे नसेल तर कामावर फोकस करणे आवश्यक आहे. वेळेचा सदउपयोग करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. ब्रेकअपच्या दुःखात वेळ घालवण्या व्यतिरीक्त कामावर लक्ष केंद्रीत केल्यास आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. यामुळे तुम्हाला समोरुन नवीन ऑफर्स मिळण्याची शक्यता वाढते.

Breakup
नवीन नाती स्वीकारा

नवीन रिलेशन्स तयार रहा

ब्रेकअप नंतर एकटे रहिल्याने दुःखात वाढ होते. एकांत आवडत असल्याने आपण समोरुन आलेले प्रपोजल स्वीकारत नाही. तसेच आपल्यावर कोणीही प्रेम करत नसल्याची भावना ही मनात सतत डोकावते. अशी जर तुमची अवस्था असेल तर तुम्ही नव्या रिलेशनशिपला नकार देऊ नका.

- Advertisement -