Saturday, January 4, 2025
HomeमानिनीFashion Tips : ऑफिसमध्ये या स्टाइलने साडी करा कॅरी

Fashion Tips : ऑफिसमध्ये या स्टाइलने साडी करा कॅरी

Subscribe

साडी ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. खास प्रसंग, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम अशा विशेष प्रसंगी महिला साडीच नेसतात. प्रत्येक महिलेला साडी नेसायला खूप आवडते. परंतु काही महिलांसाठी साडी हा केवळ विशेष प्रसंगापुरता पोशाख नसून दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. बऱ्याच महिलांना ऑफिसमध्ये साडी नेसून जायला आवडते. स्टायलिश आणि प्रोफेशनल लूक कसा मिळवायचा, असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. आज आपण जाणून घेऊयात ऑफिसमध्ये कोणत्या स्टाइलने आपण साडी कॅरी करू शकतो.

सिम्पल आणि क्लासी

बऱ्याचदा सिम्पल आणि क्लासी लूक हे उत्तम असते. जर तुम्हाला ऑफिसमध्ये प्रोफेशनल लूक पाहिजे असेल तर तुम्ही नेव्ही ब्लू, किंवा ग्रे अशा रंगाची निवड करू शकता. यामुळे तुम्हाला स्टायलिश आणि प्रोफेशनल लूक मिळेल.

- Advertisement -

फॅब्रिकची निवड

साडीमध्ये उत्तम फॅब्रिकची निवड करणे देखील अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं फॅब्रिक साधारण असेल तर तुमची साडी खूप सिम्पल वाटेल. त्यामुळे फॅब्रिकची योग्य निवड करणे देखील खूप महत्वाच आहे.

एलिगंट प्रिंट्स

सॉलिड कलर किंवा स्मॉल प्रिंट्स असलेल्या साड्या जास्त प्रोफेशनल दिसतात. स्ट्राइप्स, चेक्स, फ्लोरल प्रिंट्स आणि जियोमेट्रिक डिझाइन्स असलेल्या साड्या खूप सुंदर दिसतील.

- Advertisement -

मॉडर्न कट्स आणि डिझाइन्स

हाय नेक, शर्ट कॉलर ब्लाउज, बेल स्लीव्स किंवा थ्री-क्वार्टर स्लीव्हज असलेले ब्लाउज तुम्ही ट्राय करू शकता.

ज्वेलरी

या साड्यांवर तुम्ही सिम्पल आणि सोबर अशा ज्वेलरीची निवड करू शकता.

हेअरस्टाइल आणि मेकअप

ऑफिससाठी लो बन, पोनीटेल किंवा स्लीक ओपन हेअर स्टाइल करा.सिम्पल आणि न्यूट्रल मेकअप उत्तम दिसेल. हलकी लिपस्टिक, काजळ, आणि ब्लशने तुमचा लूक परिपूर्ण होईल.

हेही वाचा : Fashion Tips : ऑफिस आऊटफिटला असं बनवा पार्टी वेअर


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini