लग्नसराईचे दिवस सुरू झाले असून आपल्या देशात तर विवाह सोहळ्याला विशेष महत्व आहे. यामुळे आपला लग्नसोहळा जास्तीत जास्त देखणा करण्याकडे वर वधूचे कुटुंब प्रयत्न करत असतात. त्यातच एकीकडे लग्नाच्या तयारीची गडबड सुरू असते तर दुसरीकडे लग्नात येणाऱ्यांची उठबस नीट झाली पाहीजे असा आपल्याकडे शिकस्ताच असतो. नाहीतर कुटुंबातच नाराजीनाट्य सुरू होते. यामुळे यजमान म्हणून पाहुण्यांची बडदास्त जास्तीत जास्त चांगली करण्याचा सगळे प्रयत्न करतात. पण त्यासाठी गरजेचे असते मनुष्यबळ. पण शहरात हे शक्य होत नाही. कारण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मदतीला कोणी सतत उपलब्ध होणं शक्य होत नाही. यामुळे अशा संधीचा उपयोग तुम्ही बिझनेस म्हणून करू शकता आणि लाखो रुपये कमवू शकता. त्यासाठी काय करावं लागेल ते समजून घेऊया.
प्रामुख्याने आपल्याकडे सेलिब्रिटीजचे लग्न वेडींग प्लानरच प्लान करतात. पण आता वेडींग प्लानरचे महत्व सगळ्यांना समजू लागल्याने लग्नाच्या सिझनमध्ये वेडींग प्लानरला मागणीही वाढत आहे.
वेडींग प्लानर
लग्नाच्या हंगामात वेडिंग प्लॅनरची नितांत गरज असते. अशा परिस्थितीत, तुम्ही विवाहाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. तुम्हाला गरज असल्यास तुम्ही ऑनलाइन डिप्लोमा कोर्स करू शकता. यानंतर, याद्वारे तुम्ही कोणत्याही लग्नातून 1 लाख ते 2 लाख रुपये कमवू शकता.
केटरर्स
आपल्याकडे लग्नाच्या जेवणाला फार महत्व असते. लग्नातील जेवण कसे आहे त्यावरूनही अनेकजण लग्न कसे झाले ते ठरवतात. यामुळे पाहुण्यांना लज्जतदार जेवण खाऊ घालणाऱ्या कॅटरर्सला डिमांड असते. यामुळे तुम्हीही कॅटरर्स बरोबर टाय अप करून लग्नाच्या जेवणाच्या व्यव्यस्थेची जबाबदारी घेऊ शकता. यातही तुम्हाले चांगले पैसे कमावता येतात.
ड्रेस डिझायनर
ह्लली लग्न म्हणजे मोठा इंवेंट झाला आहे. यामुळे लग्नात फक्त वधू वरच नाही तर साईडर म्हणजेच कुटुंबातील व्यक्तींही विशेष लूक मध्ये बघायला मिळतात. अशावेळी जर तुम्ही क्लाईंटला ड्रेस डिझायनर मिळवून देऊ शकता. त्यातूनही तुम्ही नफा कमवू शकता.
डेकोरेशन बिझनेस
लग्नात डेकोरेशनला खूप महत्व असते. कारण हल्ली त्यावरून फोटोग्राफीची थीमही ठरते. यामुळे तुम्ही लग्नाच्या सिझनमध्ये डेकोरेशनचा व्यवसायही सुरू करू शकता. डेकोरेशनच्या व्यवसायात भरपूर नफा आहे. यासाठी तुम्हाला एक छोटी टीम तयार करावी लागेल. तसेच हॉटेल आणि रिसॉर्टच्या मालकांशी टाय अप करावे लागेल. यानंतर, जेव्हाही तुम्हाला बुकिंग मिळेल तेव्हा तुम्हाला हॉटेल आणि रिसॉर्ट मालकांना काही टक्के रक्कम द्यावी लागेल.
फोटोग्राफी
लग्न म्हटल की फोटोग्राफी आलीच. यामुळे वेडींग प्लानरला फोटोग्राफरची व्यवस्था करावी लागते. यातही आता अनेकजण फोटोग्राफीसाठी लाखो रुपये खर्च करतात. यामुळे फोटोग्राफी करणाऱ्या व्यक्तीबरोबर टाय अप करून तुम्ही तुमचे कमिशन मिळवू शकतो.
वेडींग कार्ड
लग्न म्हटलं की लग्न पत्रिका आलीच. यामुळे तुम्ही लग्न पत्रिका म्हणजेच वेडिंग कार्डचा देखील व्यवसाय करू शकता. यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा हटके डिझाईन क्रियेट करायला यायला हव्यात. अशा परिस्थितीत तुम्ही भरपूर नफा कमवू शकता.
ब्युटी पार्लर
लग्नसमारंभात मेकअप आणि मेहंदी सारख्या अनेक गोष्टी असतात. ज्यासाठी ब्युटी पार्लरची खूप आवश्यकता असते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या सलूनची सोशल मीडियावर प्रसि्दधी करावी लागेल. यानंतर तुम्हाला फक्त ऑनलाइन बुकिंग मिळणे सुरू होईल. वधूचा मेकअप करण्यासाठी किमान 10,000 रुपये खर्च येतो. जर तुम्हाला चांगले ग्राहक मिळाले तर तुम्ही त्यांच्याकडून 15 ते 20 हजार रुपये आकारू शकता.