लग्नसमारंभात नवरा-नवरीला कोणते गिफ्ट द्यायचे हा प्रश्न सर्वानाच पडतो. याचप्रमाणे आलेल्या पाहूणे मंडळीना कोणते रिटर्न गिफ्ट द्यायचे असा प्रश्न नवरा आणि नवरीलाही पडतो. कारण हल्ली लग्नात रिटर्न गिफ्ट देण्याचा ट्रेंड वाढला आहे. एकतर आधीच लग्नाचा खर्च झालेला असतो त्यात बजेचमध्ये रिटर्न गिफ्ट द्यायचे असते. तुम्हालाही हा प्रश्न सतावतोय का ? मग अजिबात काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला लग्नात रिटर्न गिफ्ट देण्यासाठी बजेटफ्रेंडली काही बेस्ट ऑप्शन सांगत आहोत.
चॉकलेट्स –
लग्नात रिटर्न गिफ्ट देण्यासाठी चॉकलेट्सचा ऑप्शन उत्तम राहिल. हल्ली बरेचजण या ऑप्शनची रिटर्न गिफ्ट देण्यासाठी निवड करतात. यात तुम्हाला विविध रंगाचे आणि प्रकारचे चॉकलेट्स बाजारात मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता.
सुका मेवा –
तुम्हाला पाहूण्यांना हेल्दी आणि तुमचे बजेट जर जास्त असेल तर सुकामेवा तुम्हाला देता येईल.
सिल्वर कॉइन –
तुमच्या लग्नाची आठवण कायम आठवणीत राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर सिल्वर कॉइन देता येईल.
इनडोअर प्लांट्स –
तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्हाला इनडोअर प्लांट्स देता येईल. यासाठी बजेटही कमी लागेल आणि पाहूणेही खूश होतील.
हॅन्डमेड साबण –
सध्या हॅन्डमेड वस्तू देण्याचा ट्रेड सुरू आहे. तुम्ही हॅन्डमेड साबण लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता. यावर तुम्हाला नावाचे पहिले अक्षर कस्टमाइज करून देता येईल.
ऑक्सडाइज दागिने –
रिटर्न गिफ्टसाठी ऑक्सडाइज दागिने देता येतील. या गिफ्टमुळे महिलावर्ग नक्कीच खूश होईल.
जुटच्या पिशव्या –
विविध शेपमधील जूटच्या पिशव्या रिटर्न गिफ्ट देण्यासाठी उत्तम ऑप्शन राहिल. या पिशव्या पर्यावरणपूरक तर असतातच शिवाय वापरण्यासाठी रफ आणि टफ असतात.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde