लग्नसोहळा म्हटलं की, सर्वच गोष्टींसाठी खर्च होतो. त्यापैकी मुख्य खर्च हा लग्नसोहळण्यावेळी घातल्या जाणाऱ्या कपड्यांसाठी केला जातो. अशातच लग्नाची शॉपिंग करताना नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याच बद्दलच्या काही खास टीप्स आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरुन तुम्ही तुमच्या बजेटनुसार लग्नाची शॉपिंग मनसोक्त करू शकता. (wedding shopping tips)
शॉपिंगची लिस्ट तयार करा
-पाहुण्यांसाठी गिफ्ट्स
-पाहुण्यांसाठी कपडे
-वेडिंग ड्रेस
-खाण्यापिण्याच्या गोष्टी
-ज्वेलरी
-वेडिंग कार्ड
या अशा गोष्टी आहेत ज्या लग्नावेळी अत्यंत गरजेच्या असतात. यावरच अधिक पैसे खर्च होतात. अशातच तुम्ही काही अन्य वेगळा खर्च करणार असाल तर त्याची सुद्धा एक आधीच वेगळी लिस्ट तयार करून ठेवा. ज्वेलरी खरेदी करताना लक्षात ठेवा की, तुमचे बजेट बिघडेल.
आता बजेट प्लॅन करा
तुम्ही काढलेली लिस्ट पाहता त्यानुसार तुमचे बजेट किती आहे हे ठरवा. त्यानुसारच शॉपिंगची सुरुवात करा. अधिक पैसे खर्च करायचे नसतील तर वेडिंग प्लॅनरला बुक करू नका. ते तुमच्याकडून अधिक पैसे घेऊ शकतात. तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एखाद्या फ्रिलांन्सर वेडिंग प्लॅनरची मदत घेऊ शकता.
शॉपिंग कोठून करताय हे महत्त्वाचे
जर तुम्हाला लग्नासाठी अधिक पैसे खर्च करायचे नसतील तर सर्वात प्रथम महत्त्वाचे म्हणजे शॉपिंग तुम्ही कोठून करताय. ब्रँन्डऐवजी तुम्ही तुमच्या ओळखीच्या टेलरकडून तुमचे कपडे शिवून घेऊ शकता. अथवा ऑनलाईन पद्धतीने ही खरेदी करू शकता. जेणेकरुन तुमचे लाखो रुपये वाचतील.
हेही वाचा- लग्नासाठी घर असे सजवा…