Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Wedding Trends: लग्नसोहळ्यासाठी कपल्स फॉलो करतायत 'हा' ट्रेंन्ड

Wedding Trends: लग्नसोहळ्यासाठी कपल्स फॉलो करतायत ‘हा’ ट्रेंन्ड

Subscribe

जर तुम्ही यंदा लग्न करण्याचा विचार करत असाल तर इंस्टावरील हॅशटॅश वेडिंग बेल्स, मूडबोर्ड फॅशन, डेकोर, मेहंदी, स्टाइलिंग मदत करु शकतात. बिग फॅट इंडियन वेडिंग असो किंवा प्रायव्हेट वेडिंग अथवा डेस्टिनेशन वेडिंग ते ग्रीन वेडिंग असो. पण सध्या कपल्स लग्नसोहळण्यासाठी एक वेगळाच ट्रेंन्ड फॉलो करताना दिसून येत आहेत.

-मोजकीच मंडळी, मॅक्सिमलिस्ट थीम
कोरोनाच्या काळात लग्नसोहळ्यासाठी पाहुण्यांच्या संख्येवर मर्यादा घातली गेली होती. आता हिच मर्यादा पाळत बहुतांश कपल्स आपल्या लग्नसोहळ्यात मोजक्याच मंडळींना आमंत्रण देतात. यावेळी अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनाच बोलावले जाते.

- Advertisement -

-गोल्डन आवर्स वेडिंग
याला गोधूलि बेला असे ही म्हटले जाते. यावेळी लग्नसोहळ्यावेळील सर्व विधी उत्तर दिशेला असणाऱ्या ध्रुव ताऱ्याला पाहून केली जातात. सात फेरे सुद्धा तसेच घेतले जातात. इवेंट प्लॅनर्स असे सांगतात की, कपल आपली संस्कृती जपत लग्नसोहळ्यावेळील सर्व विधी सुद्धा मनोभावे करत आहेत.

-ग्रीन वेडिंग
नेचर फ्रेंडली वेडिंगमध्ये कपल्सची प्राथमिकता कार्बन फुट प्रिंटला कमी करणे आणि मदर अर्थचे नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेणे. जसे की, फूड वेस्टेजला कमी करणे, प्लास्टिक आणि वन टाइम
वापरल्या जाणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे. सजावटीसाठी फुल आणि अशा काही गोष्टींचा वापर करणे ज्यांचा पुन्हा वापर केला जाईल.

- Advertisement -

-फुल एंटरटेनमेंट वेडिंग
एंटरटेनमेंट शिवाय भारतीय लग्नसोहळे पार पडणे शक्यच नाही. कपल्स पाहुण्यांच्या स्वागतासाठी फोटो बूथ सारख्या बऱ्याच गोष्टी ठेवतात. काही कपल्स तर कॅरीओके नाइट आणि फॅमिली अल्बम सारखे इवेंट ही ठेवतात. ज्यामध्ये कपल्सला आपले आयुष्य त्यामधून रिफ्लेक्ट झाल्यासारखे वाटण्यासाठी स्किट ही करतात.

-द ब्रिजटन इफेक्ट
यंदाच्या वर्षी हा इफे्ट सर्वत्र धुम गाजवत आहे. लेडी विसिल डाउन यांच्या जगाचा प्लॅनर सुद्धा त्याच प्रकारे रिक्रिएट केला जात आहे. जो शानदार विक्टोरियन एराचे चित्र उभे करतात. लेवेंडर आणि प्रिम रोज रंगाचे लहंगे तुम्हाला त्या एरामध्ये घेऊन जातात. शाही अंदाजात फुलांची सजावट, हलकी लाइटिंग आणि कॅंन्डल्सचा वापर केला जातो.

- Advertisment -