घर लाईफस्टाईल लग्नसोहळ्यासाठी वेन्यू निवडताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

लग्नसोहळ्यासाठी वेन्यू निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Subscribe

आपल्या सर्वांच्या मनात लग्नाबद्दल विविध विचार असतात. प्रत्येकालाच ग्रँन्ड वेडिंग करण्याची इच्छा असते. मात्र त्यासाठी योग्य ठिकाणाची निवड करणे फार महत्त्वाचे असते. खरंतर वेन्यू व्यवस्थितीत नसेल तर तुमच्या प्लॅनिंगची मजा बिघडली जाऊ शकते. त्यामुळे लग्नसोहळ्यासाठी वेन्यू निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याच बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

-बजेटकडे लक्ष द्या
प्लॅनिंग करण्यापूर्वी एक बजेट तयार करावे. जेणेकरुन तुम्ही तुमच्या बजेटनुसार वेन्यूची निवड करू शकता. सर्वात प्रथम बजेट ठरवल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहिजेत याकडे लक्ष द्या. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही तुमच्या हिशोबाने वेन्यू निवडू शकता.

-वातावरणाची काळजी घ्या
लग्नाचा वेन्यू हा ओपन असावा की नाही, अथवा डेकोरेशन कसे असेल हे पहावेच. त्याचसोबत तेथील वातावरणाची सुद्धा काळजी घ्यावी. जर उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी लग्न सोहळ्याचा प्लॅन करत असाल तर ओपन वेन्यू निवडू नका. असे केल्याने पाहुणे कंटाळतील.

- Advertisement -

-पाहुण्यांकडे लक्ष द्या
लग्नाची तयारी करताना पाहुणे किती येणार आहेत हे सुद्धा पहा. खरंतर प्रत्येक वेन्यूसाठी एक मर्यादित प्रमाणात लोक येऊ शकतात. जर तुम्ही 150 लोकांच्या वेन्यूमध्ये 200 लोक आल्यास तर जागा कमी पडेल.


हेही वाचा- Big fat wedding मुळे वैवाहिक नात्याला धोका, अभ्यासातून खुलासा

 

- Advertisment -