Wednesday, April 24, 2024
घरमानिनीHealthWeight Gain साठी 'या' आयुर्वेदिक टीप्स जरुर फॉलो करा

Weight Gain साठी ‘या’ आयुर्वेदिक टीप्स जरुर फॉलो करा

Subscribe

बहुतांश लोकांना वजन कमी करण्याचे टेंन्शन असत. तर काहींना आपण बारीक असल्याने टेंन्शन येते. अत्यंत बारीक असलेल्या लोकांचा आत्मविश्वास कमी होण्यासह काही वेळेस त्यांना कपडे ही मनानुसार मिळत नाहीत. तसेच बारीक असल्याने अशी लोक घराबाहेर पडताना सुद्धा दहावेळ विचार करतात. परंतु काही औषध किंवा चुर्णाचे सेवन करुन ही तुम्ही तुमचे वजन वाढवू शकता. वजन वाढवण्यासह हेल्दी डाएटसाठी काही आयुर्वेदिक टीप्सची तुम्ही मदत घेऊ शकता. (Weight gain ayurvedic tips)

सोयाबिनचा डाएटमध्ये समावेश करा
हेल्दी पद्धतीने वजन वाढवण्यासाठी डाएटमध्ये सोयाबिनचा समावेश करा. सोयाबिन प्रोटीनचा मुख्य स्रोत मानला जातो. याच्या सेवनाने शरिरातील थकवा दूर होण्यासह वजन ही वाढते. सोयाबिनमध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर आणि लोह असते जे शरिराला हेल्दी ठेवते.

- Advertisement -

अश्वगंधा पावडरचे सेवन करा
वजन वाढवण्यासाठी 1 ग्लास कोमट दुधात 1 चमचा अश्वगंधा पावडर मिक्स करा. तसेच त्यात तुप ही टाकू शकता. असे दूध दररोज प्यायल्याने वजन वेगाने वाढू शकते आणि शरिर हेल्दी सुद्धा राहते. अश्वगंधा पावडरमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम आणि लोह असते.

आराम करे
काही वेळेस सातत्याने काम केल्याने वजन वाढत नाही. तसेच जे खाते ते अंगाला लागत नाही म्हणजेच पूर्ण पोषण शरिर अब्जॉर्व करु शकत नाही. यामुळेच वजन वाढत नाही. पुरेशी झोप न घेतल्याने शरिराचे मेटाबॉलिज्म ही बिघडते आणि वजन ही वाढत नाही. शरिरात थकवा जाणवत राहतो.

- Advertisement -

3 टाइम खाणे आवश्यक
शरिराला हेल्दी ठेवण्यासाठी संपूर्ण दिवसभरात 3 वेळेस भोजन करणे आवश्यक आहे. असे केल्याने शरिराला पोषण मिळण्यासह थकवा ही दूर होऊ शकतो. तसेच वजन ही वाढले. खाण्यात प्रोटीनचा समावेश आवश्यक करा. केल्याने वजन वेगाने वाढू शकते. (Weight gain ayurvedic tips)

तुप
तुपाच्या सेवनाने वजन सुद्धा वाढवले जाऊ शकते. तुप वजन वाढवण्यासह भुक वाढवण्यास ही मदत करतात. तसेच वाताची समस्येवर ही तुपाचे सेवन करु शकता.


हेही वाचा- लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्यामागील ‘ही’ आहेत कारणं

- Advertisment -

Manini