Monday, January 20, 2025
HomeमानिनीWeight Gain Tips : या 4 पदार्थांनी वाढेल वजन

Weight Gain Tips : या 4 पदार्थांनी वाढेल वजन

Subscribe

वाढते वजन जसे अनेक जणांची डोकेदुखी ठरत आहे त्याचप्रमाणे वजन न वाढणे हे एक ही देखील तितकीच मोठी समस्या अनेकजणांना जाणवत आहे. अनेक प्रयत्न करुनही वजन न वाढल्याने आत्मविश्वासवरही परिणाम होत आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला असे 4 पदार्थ सांगणार आहोत ज्याचा सेवनाने वजन वाढण्यास नक्कीच मदत होईल. हे पदार्थ भरपूर पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याने याच्या रोजच्या सेवनाने वजन वाढण्यास नक्कीच मदत होईल.

बटाटा –

वजन वाढविण्यासाठी बटाटा खायला हवा. बटाट्यात पुरेशा प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आढळतात, जे वजन वाढीस फायदेशीर ठरतात. त्यामुळे दररोज बटाटा खाल्यास नक्कीच वजन वाढण्यास मदत होईल.

तूप –

तुम्ही तूप सुद्धा खाऊ शकता. तुपामध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढीसाठी तुम्ही तूप खाऊ शकता. वजन वाढीसाठी तूप खाणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. तूप चपातीला लावून तुम्ही खाऊ शकता. याव्यतिरिक्त डाळ किंवा भातावर टाकून तूप खाता येईल.

अंडी –

अंड्याला पूर्ण अन्न मानले जाते. अंड्यामध्ये भरपूर कॅलरीज आणि फॅट्स असतात. त्यामुळे वजन वाढवायचे असेल तर तुम्ही अंडी खायला हवीत. तुम्ही अंड उकडून किंवा ऑम्लेट बनवून देखील खाऊ शकता.

केळी –

केळ्यामध्ये कॅलरीज योग्य प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच शिवाय वजनही वाढते. केळी रोज सकाळी खाल्यास वजन नक्कीच वाढण्यास मदत होईल.

 

 

 


Edited By – Chaitali Shinde

Manini