बहुतांश लोक वेट लॉस आणि फॅट लॉस बद्दल नेहमीच बोलत असतात. या दोन्ही गोष्टींमुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. मात्र यामध्ये फरक असतो. वेट लॉस आणि फॅट लॉस बद्दल कंफ्युजन असते. स्लिम होण्यासाठी वेट लॉस पेक्षा फॅट लॉस अधिक असते. वेट लॉस झाल्यानंतर व्यक्ती स्लिम दिसतो. परंतु काही शारिरीक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. फॅट लॉस केल्याने व्यक्ती हेल्दी आणि टोंड दिसतो. वजन कमी करण्यासाठी फॅट कमी करणे अत्यंत गरजेचे मानले जाते. अशातच जाणून घेऊयात फॅट लॉस आणि वेट लॉसमधील नक्की फरक काय.
वेट लॉस म्हणजे काय?
वेट लॉस करणे म्हणजे शरीरातील मसल्स, फॅट आणि वॉटर वेट कमी करणे. शरीरात मसल्स बाइडिंग एजेंटच्या रुपात काम करतात. त्यामुळे त्यांना हेल्दी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. क्रॅश डाएट आणि ग्लुटन फ्री डाएटच्या मदतीने वजन कमी होतो. मात्र मसल्स लॉस ही होतात. सामान्य डाएट फॉलो केल्यानंतर फायदा होतो. पण अपेक्षित फायदा होत नाही. त्यामुळे स्लिम आणि टोंड बॉडीसाठी वेट लॉस नव्हे तर फॅट लॉस हे टार्गेट असावे.
फॅट लॉस म्हणजे काय?
शरीरातील लीन मास बर्न करण्यासाठी मसल्स गेन करण्याला फॅट लॉस असे म्हटले जाते. यामध्ये शरीरात साठलेल्या फॅटला बर्न केले जाते. ज्याला चरबी असे म्हणतात. फॅट कमी करण्यासाठी उत्तम आणि बेस्ट पर्याय म्हणडे कॅलरी डेफिसिटी आणि हार्ड वर्कआउट. प्रत्येकाच्या शरीरातील फॅट हे वेगवेगळे असतात. ते कमी करण्यासाठी विविध पर्याया अवलंबले जातात. टोंड बॉडीसाठी शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी केले पाहिजेत.
वेट लॉसमध्ये करु नका या चुका
-वेट लॉस करण्याच्या नादात क्रॅश डाएट किंवा ग्लूटन फ्री डाएट खाऊ नका
-वेट लॉस ऐवजी फॅट लॉसचा पर्याय वापरा
-वेट लॉसच्या प्रवासात खाणंपिणं टाळू नका
-अधिक एक्सरसाइज करणे टाळा
-एक्सरसाइज केल्यानंतर नवे मसल्स बनण्यासाठी वेळ द्या
हेही वाचा- डाएट न करता 21 दिवसात करा weight loss