घरलाईफस्टाईलवाढलेलं पोट आणि शरीरातील अवजडपणा कमी करायचाय? फॉलो करा हा डाएट प्लॅन

वाढलेलं पोट आणि शरीरातील अवजडपणा कमी करायचाय? फॉलो करा हा डाएट प्लॅन

Subscribe

पावसाळ्यात अनेकांना कोणत्याही अनेक संसर्गजन्य आजारांचा संसर्ग होऊ शकतो, यात खाण्या- पिण्याच्या सवयी बदलल्या तर पोटासंदर्भातील आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला एक खास डाएट प्लॅन फॉलो करावा लागेल. या ऋतुत हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे कारण पावसात हिरव्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया मोठ्याप्रमाणात वाढतात आणि त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत पावसाळ्यात वजन कमी करणे अवघड होते.

पावसाळ्यात हेल्दी आहार कसा घ्यावा आणि वजन कमी करण्यासाठी कसा आहार घ्यावा हे सांगणार आहोत.
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या आहार योजना संतुलित करायला शिकलात तर तुम्हाला वजन कमी करण्याचा एक सोपा मार्ग सापडला आहे. वाढलेल पोट आणि शरीरातील अवजडपणा कमी करण्यासाठी तुम्ही नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात काय खावे हे सांगणार आहोत.

- Advertisement -

वाढते वजन, पोटाची वाढती चरबी कमी करण्यासाठी फॉलो करा डाईट प्लॅन

१) वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये काय खावे?

सामान्यत: लोकांना पावसाळ्यात तळलेले भाजणे जास्त आवडते, परंतु तुम्ही दिवसाची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने करावी. वजन कमी करण्यासाठी तुम्ही पोहे, उपमा, इडली, टोस्ट किंवा पराठे खाऊ शकता. जे चवीलाही स्वादिष्ट आहेच पण ज्यामुळे तुम्ही फिटही राहू शकतात. यात तुम्ही ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी देखील पिऊ शकता.

- Advertisement -

२) वजन कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात काय खावे?

पावसाळ्यात आपली पचनक्रिया कमकुवत होते, त्यामुळे हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. तळलेल्या अन्नाऐवजी तुम्ही साधी मसूर, भाज्या, रोटी, कोशिंबीर खाऊ शकता. तुम्ही जेवणासोबत दही किंवा ताक देखील घेऊ शकता. आहारात भरपूर भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करा.

३) फॅट कमी करण्यासाठी डिनरमध्ये काय खावे?

रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे, यात पावसाळ्यातही असेच जेवण खाल्ले पाहिजे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सूप पिऊ शकता. यात तुम्ही ओट्स किंवा सॉल्टेड लापशी देखील खाऊ शकतात. दुधीसारख्या हलक्या भाज्यांसह 1-2 रोटी असे पौष्टिक जेवण खाऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास हळद घातलेले दूध पिण्यास विसरू नका. या पदार्थांसह इंफेक्शनविरोधी आपण अनेक प्रकारच्या इम्यूनिटी बुस्टर भाज्या खाऊ शकता.

आजपासूनचं हे पदार्थ खाणे टाळा

पावसाळ्यात जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे. चायनीज फूड, चाट, समोसे किंवा कोणत्याही प्रकारच्या स्ट्रीट फूडपासून दूर राहा. तसेच पावसाळ्यातील ओलावा, घाण आणि बॅक्टेरियामुळे हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत. तसेच डब्बाबंद ज्यूस पिणे टाळा.

पावसाळ्यात निरोगी आणि फिट राहण्यासाठी या गोष्टी खा

कमी चरबीयुक्त डाळी आणि भाज्या खाव्यात. यात टरबूज, हंगामी फळ, खरबूज आणि लिची खाणं शरीरास उपयुक्त आहे. या ऋतूत हलके आणि सहज पचणारे अन्नच खावे. कारण पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे स्वच्छतेची खूप काळजी घ्या. पावसाळ्यात तहान लागत नाही तरी भरपूर पाणी प्यावे. तसेच आहारात लिंबूचा समावेश करा, कोणत्याही प्रकारे त्याचा आहारात लिंबूचा समावेश करा. फळे आणि भाज्यांमध्ये कीटकांचे प्रमाण खूप जास्त असते, म्हणून स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व भाज्या, फळ धुवून मग कापा.

(अस्वीकरण: ही माहिती केवळ सामान्य माहिती प्रदान करते. यात कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. माय महानगर या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -