Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthवाढलेले वजन 'या' एक्झरसाइजने करा कमी

वाढलेले वजन ‘या’ एक्झरसाइजने करा कमी

Subscribe

दररोज अर्धा तास व्यायाम केल्याने ही तुम्ही तंदुरुस्त राहता. मात्र सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:कडे लक्ष देता येत नाही. यामुळे होणाऱ्या समस्येपैकी एक म्हणजे वजन वाढणे. बहुतांशजण सध्या या समस्येने त्रस्त आहेत. यावर कितीही उपाय करून वजन मनानुसार कमी होत नाही. अशातच वाढलेले वजन तुम्ही पुढील काही एक्झरसाइजने कमी करू शकता.

कमी वेळात वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज बर्पी एक्सरसाइज करू शकता. यामुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होईल बर्पी एक्सरसाइज एकत्रितरित्या तीन एक्सरसाइझचे कॉम्बिनेशन आहे. त्यामध्ये जपिंग जॅक, स्क्वॉट्स आणि पुशअप्सचा समावेश होतो. या तिन्ही एक्सरसाइज तुमच्या शरीरातील फॅट आणि वजन कमी करण्यास मदत करतील.

- Advertisement -

How to Do a Burpee: Step-by-Step Guide, Benefits, Variations

अशी करा ही एक्सरसाइज
-सर्वात प्रथम सरळ उभे रहा
-त्यानंतर जपिंग जॅकच्या पोजीशनमध्ये उडी मारा
-आता स्क्वॉट्सच्या पोजीशनमध्ये या
– तिसरी स्टेप पुशअप, स्क्वॉट्स पोजीशनमध्ये हात पुढे घेत पुशअपच्या पोजीशनमध्ये या
-आता त्याच वेगाने पुन्हा सरळ उभे राहून उडी मारा
-या सर्व स्टेप्स एकामागून एक करत रहा

- Advertisement -

बर्पी एक्सरसाइझचे फायदे
-बर्पी एक्सरसाइज केल्याने संपूर्ण बॉडीतील फॅट कमी होण्यास मदत मिळते
-ज्यांचे वजन वाढलेले असते त्यांच्यासाठी ही एक्सरसाइझ फायदेशीर आहे
-या एक्सरसाइझमुळे केवळ बेली फॅटच नव्हे तर तुमचे हिप्स, थाइज, हातांचे फॅट कमी होते
-शरीराचा स्टॅमिना वाढला जातो
-पायांचे मसल्स मजबूत होतात


हेही वाचा- हिप्स टोन करण्यासाठी करा ‘या’ एक्सरसाइज

- Advertisment -

Manini