Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health वेट लॉससाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांना करावी लागते जास्त मेहनत

वेट लॉससाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांना करावी लागते जास्त मेहनत

Subscribe

पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजन कमी करणे अधिक कठीण होते असे बोलले जाते. मात्र असे का असते? आपण पाहतो की, महिलांमध्ये केवळ वजन कमी करण्यासाटी अधिक मेहनतीची आवश्यकता नसते. तर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये वजन अधिक वाढले जाते. अशातच एक्सपर्ट्स नक्की काय म्हणतात हे पाहूयात.

-महिलांमध्ये वजन लवकर वाढले जाते
पुरुषांच्या तुलनेत महिलांचे वजन अधिक वेगाने वाढले जाते. हे प्युबर्टीच्या कारणास्तव सुरु होते. प्युबर्टीमुळे बहुतांश मुलींचे वजन वाढलेले दिसते. तर मुलांचे वजन हे कमीच असते. मात्र अडल्टहुड येईपर्यंत दोघांच्या शरीरात 35-40 टक्के फॅट तयार होते. त्यामुळे महिला सहज वजन वाढले जाते आणि त्यांना वजन कमी करण्यास अधिक स्ट्रगल करावा लागतो.

- Advertisement -

-पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मेटाबॉलिज्म असतो स्लो
महिलांमध्ये मेटाबॉलिज्म स्लो असल्याच्या कारणास्तव एक सामान्य शारीरिक हालचाली केल्यानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कमी प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. अशा प्रकारे पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजन कमी करणे अधिक चॅलेजिंग असते.

-फॅट स्टोरेज कॅपेसिटी वेगळी असते
पुरुष आणि महिलांमध्ये फॅट डिस्ट्रिब्युशन आणि स्टोरेज कॅपेसिटी वेगवेगळी असते. पुरुषांमध्ये पोटाच्या आसपासच्या ठिकाणी फॅट अधिक वाढले जाते. तर महिलांमध्ये हिप्स आणि थाइजच्या येथे फॅट्स वाढले जाते. या स्थितीसाठी हार्मोनल पॅटर्न जबाबदार असते. हिप आणि थाइजचे फॅट लवकर बर्न होत नाहीत. त्यामुळेच महिलांना तेथील फॅट कमी करण्यासाठी फार वेळ लागतो.

- Advertisement -

-महिलांच्या तुलनेत पुरुष लवकर करतात फॅट बर्न
पुरुषांमध्ये फॅट स्टोरेज त्यांच्या पोटाखाली असते. त्यामुळे थाइज आणि हिप्सच्या तुलनेत अगदी सहज बर्न केले जाऊ शकतात. त्याचसोबत पुरुषांच्या शरिरात महिलांच्या तुलनेत अधिक स्नायू असतात. त्याच कारणास्तप पुरुषांमध्ये फॅट बर्निंग कॅपेसिटी अधिक असते. स्नायू फॅट बर्न करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भुमिका निभावतात.


हेही वाचा- पार्टनरसोबत एक्सरसाइझ करणे सेक्स लाइफसाठी फायदेशीर

- Advertisment -

Manini