Wednesday, February 12, 2025
HomeमानिनीHealth Tips : वेटलॉसच्या औषधांनी वजन होईल कमी पण अवयव होतील निकामी

Health Tips : वेटलॉसच्या औषधांनी वजन होईल कमी पण अवयव होतील निकामी

Subscribe

जर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायाम करायला किंवा जिमला जायलाही वेळ नाही आणि डाएट करणंही शक्य नाही. यामुळे जर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या वेट लॉसच्या गोळ्या आणि पाव़डर घेत असाल तर ही माहीती तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण इटपट वजन कमी करण्यासाठी तुम्हाला वर्षानुवर्ष घ्याव्या लागणाऱ्या गोळ्या, पावडर आणि इतर औषधं तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. एवढंच नाही तर यामुळे तुमचा एखादा अवयवही कायमचा डॅमेज होऊ शकतो. असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते साधारणतं वजन कमी करण्याच्या औषधांचा वापर 7 प्रकारे आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो.

वेट लॉसचा दावा करणारी औषधं तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचवण्यासोबतच फुफ्फुस, यकृत आणि घसा इत्यादींनाही हानी पोहोचवू शकतात. या गोळ्या तुमची भूक कमी करतात, ज्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होते.

डॉक्टरही परिस्थिती पाहूनच या औषधांचा सल्ला देतात. साधारणपणे, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स ३० पेक्षा जास्त आहे अशा लोकांना या औषधांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

त्यांच्या सेवनामुळे तुम्हाला सांधेदुखी, बद्धकोष्ठता, चक्कर येणे, निद्रानाश यासह अनेक समस्या होण्याची शक्यता असते. काही गंभीर आजार असल्यास तुम्हाला हे औषध दिले जाण्याची शक्यता आहे, परंतु निरोगी व्यक्तीसाठी या औषधांचे सेवन निश्चितच हानिकारक आहे.

पोटाच्या समस्या

वजन कमी करण्याच्या औषधांमध्ये फॅट ब्लॉकर्स आढळतात, त्यामुळे अपचन, उलट्या, पोट फुगणे आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

इतकंच नाही तर पचनाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्याच्या नियमित सेवनामुळे तुमच्या पोटाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो, ज्यामुळे तुमच्या शरीराची कोणतीही पोषक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता कमी होते.

चयापचय

या औषधांचे अधिककाळ सेवन केल्याने तुमच्या चयापचयावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होण्याऐवजी वाढू शकते.

भूक न लागल्यामुळे, शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होते, यामुळे तुमची चयापचय क्रिया करण्याची क्षमता देखील प्रभावित होते किंवा उलट कमी होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करण्यासाठी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

त्यामुळे शरीरात कमी प्रमाणात कॅलरीज पोहोचतात आणि त्यात कार्बोहायड्रेट्सची कमतरता असते. कार्बोहायड्रेट्सच्या कमतरतेमुळे, लोकांना सुस्त वाटते. अशा स्थितीत त्यांना लवकर थकवा येणे, अशक्तपणा यासारखी लक्षणे जाणवतात.

किडनी स्टोन

वेट लॉस गोळ्यांचे सेवन केल्याने तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो

त्यामुळे संसर्गाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. आतड्यांमध्ये ऑक्सॅलिक ऍसिड जमा झाल्यामुळे, पित्त मूत्राशयात दगड तयार होण्याची प्रक्रिया देखील सुरू होऊ शकते. त्यामुळे आधीच मूत्रपिंडाचा त्रास असलेल्या व्यक्तीने अशी औषधे टाळावीत. अन्यथा त्यामुळे किडनीच्या समस्या आणखी तीव्र होऊ शकतात.

यकृत

वजन कमी करण्याची औषधे थेट तुमच्या यकृतावर हल्ला करतात. एका संशोधनानुसार, वजन कमी करण्याची औषधे किंवा कोणत्याही प्रकारच्या सप्लिमेंट्समुळे तुमच्या यकृतामध्ये सूज येऊ शकते. दीर्घकाळापर्यंत अशा गोष्टी घेतल्यानंतर 17 पैकी 12 जणांमध्ये यकृत प्रत्यारोपणाची प्रकरणेही आढळून आली आहेत.

मूत्रपिंड

अधिक काळ या औषधांचे सेवन केल्याने मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते, आतड्यांमध्ये ऑक्सॅलिक ॲसिड देखील जमा होते. जे किडनीसाठी हानिकारक आहे.

यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर वेट लॉस गोळ्या औषधांचा शॉर्टकट न वापरता व्यायाम आणि सकस आहार घेऊन नैसर्गिकरित्या वजन कमी करावे.

 

 

 

हेही पाहा –

Manini