Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealthWeight Loss: जेवण शिजवण्याच्या 'या' पद्धतीने कमी करू शकता वजन

Weight Loss: जेवण शिजवण्याच्या ‘या’ पद्धतीने कमी करू शकता वजन

Subscribe

वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायाम करणे फार महत्वाचे असते असे सांगितले जाते. परंतु बिझी शेड्युल किंवा एखाद्या फिजिकल समस्येमुळे व्यायाम करता येत नाही. अशातच डाएट हा दुसरा ऑप्शन राहतो, जेणेकरुन वाढलेले वजन कमी करु शकतो.

वजन कमी करायचे असेल तर तुम्ही याची सुरुवात तुमच्या किचनपासूनच करा. ज्यामध्ये पहिला टप्पा असा की, जेवण बनवण्याची योग्य पद्धत. हे सुद्धा फार महत्वाचे असते. जेव्हा जेवण व्यवस्थितीत शिजवले जाते तेव्हा त्यामधील न्युट्रीएंट्स राहतात आणि यामुळेच तुमचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. तर जाणून घेऊयात जेवण बनवण्याच्या योग्य पद्धतीबद्दल अधिक.

- Advertisement -

-वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रथम जेवण शिजवण्यासाठी तेल पुरेशा प्रमाणात घ्यावे. भाजीसाठी तेवढेच तेल घ्यावे जेणेकरुन भाजी भांड्याला चिकटून राहणार नाही. यासाठी तुम्ही स्प्रे ऑइल स्प्रिटचा वापर करु शकता.

-बहुतांश घरात जेवण शिजवण्यासाठी रिफाइंड वेजिटेबलचा वापर केला जातो. यामुळे शरिरात सूज येण्याची समस्या होऊ शकते. लठ्ठपणासह अन्य काही गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो. अशातच तुम्ही ऑलिव ऑइल, नारळाचे तेल हे जेवणासाठी वापरले पाहिजे.

- Advertisement -

-डीप फ्राय केल्याने पदार्थांची चव वाढते. पण यामुळे लठ्ठपणा सुद्धा वाढू शकतो. अशातच डीप फ्राइ करण्याऐवजी ग्रिलिंगचा ऑप्शन निवडू शकता.

-पदार्थ चविष्ट व्हावेत म्हणून आपण मीठ सतत टाकत राहतो. पण असे करणे चुकीचे आहे. यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. मीठासह दालचीनी, जायफळ, तुळस सारख्या गोष्टींनी पदार्थांची चव वाढवू शकता.

-भाज्या उकळवण्याऐवजी त्या स्टिम करा. जेणेकरुन त्यामधील न्युट्रिशन्स कायम राहतील आणि वजन ही नियंत्रणात राहिल.

-ज्या भाज्या न सोलता सुद्धा खाऊ शकतो तर त्या जरुर खाव्यात. कारण काही भाज्यांच्या सालीमध्ये न्युट्रिशन्स, अँन्टीऑक्सिडेंट आणि फायबर असतात. यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.


हेही वाचा- उभं राहून पाणी पिणे म्हणजे ‘या’ आजारांचा धोका

 

- Advertisment -

Manini