बिझी लाइफस्टाइलमुळे आपल्याला अनेकदा जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही फिट राहू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या वाढत्या वजनाची काळजी वाटत असेल, तर आता काळजी करण्याची फार गरज नाही.कोणत्याही जिम उपकरणांशिवाय, तुम्ही घरीच तुमचे फॅट्स बर्न करू शकता आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. जाणून घेऊयात काही अशा आसनांविषयी ज्यांना ऍनिमल योगासने म्हटले जाते. ही योगासने केल्यास काही दिवसांतच तुमची चरबी वेगाने कमी होईल. आणि केवळ एवढेच नाही तर तुमचे शरीर लवचीक देखील होईल.
डाउनवर्ड डॉग पोझ :
डाउनवर्ड डॉग पोझ ही सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी योगासनांपैकी एक आहे. हे संपूर्ण शरीर मजबूत करण्यास, पोटाची चरबी कमी करण्यास आणि लवचीकपणा वाढवण्यास मदत करते. या आसनामुळे हात, पाय, पाठ आणि खांद्याचे स्नायू बळकट होतात. तुम्ही हे आसन घरीदेखील अगदी सहजपणे करू शकता.
कसे करायचे?
सर्वप्रथम, योगा मॅटवर उभे राहा आणि खाली वाकून तुमचे हात जमिनीवर ठेवा. आता पाय मागे घ्या आणि शरीराला उलट्या V अक्षराच्या आकारात आणा. नंतर कंबर वर उचला, डोके खाली वाकवा आणि आता टाचांना जमिनीकडे दाबण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान, तुमचे तळवे जमिनीवर घट्ट ठेवून तुमची मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. 20 ते 30 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर हळूहळू मूळ स्थितीत परत या.
टायगर पोझ :
टायगर पोझ हे असेच एक योगासन आहे जे शरीराचा लवचीकपणा वाढवण्यास तसेच कंबर, पोट आणि कंबरेवरील चरबी कमी करण्यास मदत करते . हे आसन पाठीचा कणा मजबूत करते आणि शरीराचे संतुलन सुधारण्यास देखील मदत ठरते.
कसे करायचे?
सर्वप्रथम, योगा मॅटवर गुडघे आणि हातावर हात ठेवून टेबलटॉप पोझमध्ये बसा. आता उजवा पाय मागच्या दिशेने सरळ करा आणि डोके थोडे वरच्या बाजूला उचला. नंतर उजवा गुडघा वाकवून छातीजवळ आणा आणि कपाळाने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ही प्रक्रिया 10 वेळा पुन्हा करा आणि नंतर दुसऱ्या पायानेही असेच करा. संपूर्ण आसन करताना तुमचा श्वास नॉर्मल ठेवा.
फ्रॉग पोझ :
या योगासनामुळे पोट, मांड्या आणि कंबरेवरील चरबी कमी होण्यास मदत होते. शरीर अधिक लवचीक बनवण्यास, पचनक्रिया आणि रक्ताभिसरण सुधारण्यास हे आसन मदत करते. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही हे आसन दररोज 10 मिनिटांकरता करू शकता.

कसे करायचे?
प्रथम, योगा मॅटवर गुडघ्यावर बसा आणि तुमचे पाय थोडे बाहेरच्या दिशेने पसरवा. तुमचे पाय इतके लांब पसरवा की तुम्हाला तुमच्या मांड्यांमध्ये ताण जाणवू लागेल. आता दोन्ही तळवे जमिनीवर ठेवा आणि हळूहळू शरीर पुढे वाकवा. यादरम्यान, तुमची पाठ सरळ ठेवा आणि 20 ते 30 सेकंदांसाठी या स्थितीमध्ये रहा. मग हळूहळू पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. हेही वाचा : Beauty Tips : बेबी सॉफ्ट स्किनसाठी असा करा डाएट प्लान
Edited By – Tanvi Gundaye