Thursday, April 25, 2024
घरमानिनीव्यायाम न करता अशा प्रकारे करा वजन कमी; आठवड्याभरात व्हा फिट

व्यायाम न करता अशा प्रकारे करा वजन कमी; आठवड्याभरात व्हा फिट

Subscribe

बदलत्या खाण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलमुळे अनेकजण लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. लठ्ठपणा ही अशी समस्या आहे ज्यामुळे अनेक आजार बळावू लागतात. या लठ्ठपणापासून मुक्ती मिळवणे आजच्या धावपळीच्या जगात मोठी समस्या बनतेय. अशा स्थितीत बरेच लोकं वजन कमी करण्यासाठी तासानतास व्यायाम करतात. पण तरीही काही परिणाम होत नाही, मात्र अधिक व्यायाम करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र आज आम्ही तुम्हा अशी माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही व्यायाम आणि डाएटिंगशिवाय तुमचे वजन कमी करू शकता.

व्यायामाशिवाय करा वजन कमी

१) रिफाइंड ऑईलचा वापर टाळा

आहारात तेलाचे प्रमाण कमीचं असले पाहिजे. पण खरचं वजन कमी करायचे असेल तर स्वयंपाक करताना रिफाइंड ऑईल वापरू नका. कारण रिफाइंड ऑईलमधील चांगले घटक रिफाइंड करताना निघून जातात. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते अधिक वाढते.

- Advertisement -

२) ग्रीन टी प्या

ग्रीन टी हा विशेषतः वजन कमी करण्यासाठी ओळखला जातो. यामुळे शरीरातील फॅट कमी होतात. जर तुम्ही दररोज 2 किंवा 3 ग्रीन टी पित असताल तर तुमची मेटाबॉलिज्म वाढवते आणि बॉडी डिटॉक्सिफाय देखील होते. तुमची इच्छा असल्यास तुम्ही कोमट पाणी घेत त्यात लिंबू, मध किंवा ओवा टाकून पिऊ शकता.

३) कोमट पाणी प्या

पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर भरपूर पाणी प्या. असे केल्याने शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर पडतात. कोमट पाणी प्यायल्यास अतिरिक्त चरबी सहज कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायले तर तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते.


कार्तिक आर्यनचे ‘हे’ आहेत 5 सुपरहिट चित्रपट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -

Manini