Friday, December 13, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthWeight Loss Tips : झिरो फिगरसाठी ट्राय करा या इनडोअर एक्सरसाइज

Weight Loss Tips : झिरो फिगरसाठी ट्राय करा या इनडोअर एक्सरसाइज

Subscribe

वजन जितक्या सहज वाढतं, त्यापेक्षा त्याला कमी करणं खूप कठीण असतं. वजन कमी करण्यासाठी लोक महाग महाग जिममध्ये जाऊन अक्षरश: घाम गाळतात. परंतु सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात व्यायामाकरता आणि जिमला जाण्याकरता अनेकांना वेळ मिळत नाही. काहीजण केवळ त्यांच्या आहारात बदल करून वजन कमी करण्याचे प्रयत्न करतात. पण केवळ इतकंच पुरेसं नाही. डायट करून वजन कमी करणं कठीण आहे. याकरता व्यायाम करणेही गरजचे असते.

जर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि व्यायाम करण्यासाठी तुम्ही जिमला जाऊ शकत नसाल तर काही इनडोअर ए्क्सरसाइजही तुम्ही करू शकता. ज्यांना तुम्ही तुमच्या रूटीनचा भाग बनवून आरामात घरबसल्या तुमचं वजन कमी करू शकता.

- Advertisement -

1. प्लँक :

Weight Loss Tips: Try this indoor exercise for zero figure

हा एक असा व्यायामप्रकार आहे जो पोटाच्या मांसपेशींना मजबूत बनवण्यासाठी मदत करतो. प्लँक केल्याने फॅट बर्न होते. हे करण्याकरता आधी जमिनीवर पालथे झोपा. आता आपल्या हातांचा, कोपरांचा आणि पायाच्या बोटांचा आधार घेत पोट, छाती व पायाकडील भाग वर उचला आणि शरीर ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 30 ते 60 सेकंदाकरता याच स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. 2-3 वेळा ही प्रक्रिया परत करा.

- Advertisement -

2. माउंटेन क्लायंबर :

Weight Loss Tips: Try this indoor exercise for zero figure

माउंटेन क्लायंबर पोटाची चरबी सहज कमी करू शकतो. हा एक असा व्यायाम प्रकार आहे जो शरीराला सुडौल बनवू शकतो. यासाठी पालथे झोपा. हाताच्या तळव्यांचा आणि पायाच्या बोटांचा आधार घेत संपूर्ण शरीराला जमिनीपासून वर उचला. आता एक पाय हळूहळू छातीजवळ आणा व पुन्हा पाठी न्या. अगदी तशीच क्रिया दुसऱ्या पायासोबतही करा.

3. दोरीउड्या :

Weight Loss Tips: Try this indoor exercise for zero figure

दोरीउड्या मारणे हा वर्षानुवर्षे वजन घटवण्यासाठी एक चांगला पर्याय समजला जातो. दोरीउड्या मारल्याने पोट आणि शरीराच्या अन्य काही जागांवरील चरबी सहज कमी होऊ शकते. सगळ्यात आधी पाच मिनिटांकरता हळूहळू दोरीउड्या मारण्याचा सराव करा. मग हा वेळ थोडा थोडा वाढवत न्या.

4. पुश अप करा :

Weight Loss Tips: Try this indoor exercise for zero figure

पुश अप वेट लॉससाठी सगळ्यात महत्त्वाचा व्यायामप्रकार समजला जातो. हा शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत करतो. हा व्यायाम करण्यासाठी पालथे झोपा. हाताच्या तळव्यांचा आणि पायाच्या बोटांचा आधार घेत संपूर्ण शरीराला जमिनीपासून वर उचला. आणि पुन्हा खाली न्या. ही क्रिया वारंवार करत रहा. हळूहळू वेळ वाढवत न्या.

हेही वाचा : Winter Health Care : हिवाळ्यात या ड्रिंक्सने वाढेल रोगप्रतिकारशक्ती


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini