Friday, April 26, 2024
घरमानिनीवाढलेले वजन झटपट कमी करायचंय?

वाढलेले वजन झटपट कमी करायचंय?

Subscribe

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकालाच आपल्या हेल्थकडे लक्ष देणे शक्य नसते. अशातच त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकीच एक असलेली समस्या म्हणजे वजन वाढणे. ही समस्या उद्भवल्यास खासकरुन महिलांना अनकंफर्टेबल वाटू लागते. त्यामुळे त्या वजन कमी करण्यासाठी विविध गोष्टींचा आधार घेतात. परंतु तुम्हाला झटपट वजन कमी करायचे असेल तर पुढील काही टीप्स जरुर तुमच्या कामी येतील.

खरंतर आठवड्यातून एकदा तरी बॉडी डिटॉक्स केली पाहिजे. जेणेकरुन तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईलच. पण तुमच्या शरिराचा आकार सुद्धा व्यवस्थितीत राहील.

- Advertisement -

-वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स डाएट केल्यास त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. याच्या माध्यमातून तुमच्या शरिरातील हानिकारक पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्मला प्रोत्साहन मिळते.

-वेट लॉस करण्यासाठी तुमच्या दिवसाच्या सुरुवातीला डिटॉक्स ड्रिंक पिणे फायदेशीर ठरेल.

- Advertisement -

डिटॉक्स ड्रिंक कसे तयार कराल?


काकडी, पुदीना, लिंबू आणि थोडेस मध घेऊन डिटॉक्स ड्रिंक तयार करा. हे डिटॉक्स ड्रिंक तुम्ही सकाळी पिऊ शकता. यामुळे तुमची पचनाची क्रिया सुधारेल. तसेच सर्व हैवी फूड्स खाल्ल्यानंतर तुम्हाला हलके वाटेल.

भाज्या
बहुतांश तेलकट अथवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर त्या सर्वांचे संतुलित करण्यासाठी भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात करा. तुम्ही भाज्या सलाडच्या रुपात किंवा वेजिटेबल स्मूदी म्हणून वापरु शकता. तुमच्या जेवण्यात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

कमी साखरेचा वापर
सर्व प्रकारच्या डेजर्टपासून दूर रहा. जर तुम्हाला गोड पदार्थ खायचे असतील तर तुम्ही कमी साखरेचे पदार्थ अथाव फळांचे सेवन करा. फळं ही आवश्यक पोषक तत्वांचे एक मोठे स्रोत असते.

अल्कोहोल पासून दूर रहा
अल्कोहोल घेतल्यानंतर तुमचे शरिर जरुर डिटॉक्स करा. यासाठी तुम्ही ताज्या फळांचा ज्युस अथवा स्मुदी किंवा डिटॉक्स ड्रिंक प्या. जेणेकरुन तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

 


हेही वाचा- वजन कमी करण्यासाठी एक मुठ मखाने आहेत फायदेशीर

- Advertisment -

Manini