Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी वजन कमी केल्यास कोरोनाचा धोका टाळता येतो, संशोधनातील दावा

वजन कमी केल्यास कोरोनाचा धोका टाळता येतो, संशोधनातील दावा

जास्त वजन आणि लठ्ठपणा यामुळे आतापर्यंत अनेक रुग्ण ICU मध्ये दाखल

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनामुळे अनेकांचे जीव जात आहेत. ऑक्सिज न मिळाल्यानेही लोकांचा मृत्यू होत आहे. अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने रुग्ण थेट आसीयूमध्ये दाखल झाले आहेत. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने अनेक जणांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहेत. युकेमध्ये ७० टक्के मृत्यू होणाऱ्या लोकांचे वय हे ७५ वर्ष किंवा त्याहून अधिक आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे अनेक बदल समोर आले आहेत. अनुवंशिकता,लिंग लठ्ठपणामुळेही कोरोनाचा धोका वाढू शकतो असे म्हटले जात आहे. त्याचत वजन कमी केल्यास कोरोनाचा धोका टाळता येतो असा दावा संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी केलेल्या अभ्यासात सुरुवातीला असे लक्षात आले आहे की, जास्त वजन आणि लठ्ठपणा यामुळे आतापर्यंत अनेक रुग्ण ICU मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे जर वजन कमी करता आले तर आपल्याला होणारा कोरोनाचा धोका कमी करता येऊ शकतो असे, संशोधकांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी नेचर्समध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता त्यात असे म्हटले होते की, लठ्ठपणा किंवा वाढलेल्या वजनामुळे कोरोनामुळे मृत्यू होत आहे. लॉकडाऊनमध्ये जर वजन वाढले असेल तर जास्त वजनामुळे तुम्हाला कोरोनाचा धोका संभवू शकतो असे संशोधकांच्या अभ्यासात म्हटले होते.

- Advertisement -

संशोधकांनी केलेल्या अभ्यासातील जास्त वजनाच्या ६९ लाख १० हजार ६९५ लोकांपैकी १३ हजार ५०३ जण कोरोनामुळे रुग्णालयाताल दाखल झाले. त्यातील १ हजार ६०२ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तर ५ हजार ४७९ जणांचा युकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील बरेच लोक हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते, असे अभ्यासकांनी सांगितले.

वजन कमी केल्याने आरोग्याला इतरही अनेक फायदे होतात. त्यामुळे वजन कमी केल्यास कोरोनापासून होणारा धोका कमी होईल असे संशोधकांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे वजन कमी झाल्यास ह्रदयरोग,मधुमेह,कर्करोग यांसारखे आजार होण्याचा धोका कमी होईल. वजन कमी करणे ही सोप्पी प्रक्रिया नाही परंतू दररोज व्यायाम करुन, योग्य आहार घेऊन वजन कमी करता येऊ शकते असे संशोधकांनी म्हटले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – होम आयसोलेशनमध्ये आहात? ऑक्सिजन लेव्हल, शरीराचे तापमान दिवसभरात किती वेळा तपासाल? जाणून घ्या

- Advertisement -