Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health डाएट न करता 21 दिवसात करा weight loss

डाएट न करता 21 दिवसात करा weight loss

Subscribe

आजकाल बदलत्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतांश जणांना लठ्ठपणाची समस्या उद्भवते. वजन वाढणे जेवढे सोपे असतेच तेवढेच कठीण ते कमी करणे. अशातच वजन कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करतो. काहीजण डाएट फॉलो करतात तर काही दिवसभरातून केवळ एकदाच खातात. अथवा काही लोक जिम करतात. (Weight loss without diet)

अशातच तुम्ही सुद्धा वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहात का आणि डाएटशिवाय वजन कमी करायचे आहे का? याच संदर्भातील काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केवळ 21 दिवसात तुम्हाला या टीप्सच्या माध्यमातून वजन कमी करता येऊ शकते.

- Advertisement -

-सकाळी हेल्दी नाश्ता
आपल्या दिवसाची सुरुवात पॉवर-पॅक नाश्तापासून करावी. हे तुम्हाला मेटाबॉलिज्मला अॅक्टिव्ह ठेवतो आणि क्रेविंग दूर होते. प्रोटीनयुक्त अंडी, फायबरयुक्त असलेले ओट्स आणि फळांसह दही सुद्धा तुम्ही खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी लीन प्रोटीन तुम्हाला फायदेशीर ठरतील. ते खाल्ल्यानंतर तुम्हाला खुप वेळ भूक लागणार नाही. दही, नट्स, बीन्स किंवा लीन मीट सारखे प्रोटीन तुम्ही जेवणात किंवा नाश्तात खाऊ शकता.

-अॅक्टिव्हिटी वाढवा
दीर्घकाळ बसून राहिल्याने वजन वाढू लागते. यामुळे दररोज थोडीतरी अॅक्टिव्हिटी करा. यासाटी तुम्ही खुप वेळ वॉक किंवा डांन्स करू शकता. दररोज 10 हजार स्टेप्स चालल्यास ही तुमचे वजन कमी होऊ शकते.

- Advertisement -

-दिवसभर मर्यादित प्रमाणात खा
दिवसभराात एकदाच खुप खाण्याऐवजी कमी कमी प्रमाणात खा. विचार करून खा. या व्यतिरिक्त वजन वाढण्यामागील एक कारण म्हणजे रात्री उशिरा जेवणे. बहुतांश लोक रात्री दहा वाजल्यानंतर ही जेवतात. यामुळे शरिरात जेवण व्यवस्थितीत पचले जात नाही. यामुळे शरीराला पोषण मिळण्याऐवजी चरबी जमा होऊ लागते.

-हाइड्रेट रहा
पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. यामुळे दररोज पाण्याचे सेवन करुन स्वत:ला हाइड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. खाण्यापूर्वी पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. या व्यतिरिक्त हाइड्रेट राहण्यासाठी तुम्ही सॉफ्ट ड्रिंक, रेडीमेड ज्यूसच्या सेवनापासून दूर रहावे. यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे कॅलरीज कमी होण्याऐवजी वाढल्या जातील.


हेही वाचा- वेट लॉससाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांना करावी लागते जास्त मेहनत

- Advertisment -

Manini