Wednesday, March 19, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : या पानांमध्ये दडलंय हेल्थ सिक्रेट

Health Tips : या पानांमध्ये दडलंय हेल्थ सिक्रेट

Subscribe

निर्सगातील प्रत्येक गोष्ट मानवाला काही ना काही दान देते. हिरवीगार झाडेही अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. अनेक आजारांवर झाडाची पाने, फूले, फळे उपयुक्त आहेत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अनेक शारीरिक व्याधींवर उपाय म्हणून वरदान समजली जाणारी झाडांची पाने सांगणार आहोत.

पुदिन्याची पाने –

पुदिन्याची पाने आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या पानांमध्ये ऍटी-ऑक्सिडंट, फायटोन्यूट्रिएंट्ससोबतच फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. यातील गुणधर्मांमुळे पोट थंड करण्यास, अपचन , तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत होते.

मेथीची पाने –

मेथीच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन सारखे पोषकतत्वे आढळतात. या पानांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

कडीपत्ता –

कडीपत्ताच्या पानांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल, अतिसार, बद्धकोष्ठता, पोटाच्या तक्रारी दूर होतात. यातील व्हिटॅमिन सी डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

कोथिंबीरची पाने –

कोथिंबीरची पानांतील गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यासह हृदय, मेंदू, त्वचा आणि पाचनतंत्र सुरळीत होण्यासाठी मदत होते.

शतावरीची पाने –

शतावरीच्या पानांमध्ये ऍस्पार्टिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील अतिरिक्त अमोनिया नियंत्रित करण्यास मदत करते. यासह अशक्तपणा दूर करण्यासाठी शतावरीची पाने वरदान समजली जातात.

बेलपत्र –

महादेवाला प्रिय असणारे बेलपत्र विविध गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6 सारखे पोषकतत्वे आढळतात. यासह बेलपत्राचा प्रभाव थंड असल्याने शरीर थंड ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे पोटात जळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

सुपारीची पाने –

पचनाच्या तक्रारी दूर करण्यासाठी सुपारीची पाने खावीत. यातील ऍटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे तोडांतील बॅक्टेरिया नष्ट करते. ज्यामुळे तोडांतील अल्सरचा धोका कमी होतो.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini