प्रत्येकाला शरीरात वेगवेगळ्या प्रकारची कमतरता जाणवत असते. दैनंदिन जीवनात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे किंवा करू नये याकडे आपले बारकाईने लक्ष असणे आवश्यक आहे. शरीरातील कमकुवत हाडे ही आपल्या संपूर्ण शरीरासाठी धोक्याची घंटा असते.

आपले संपूर्ण शरीर हाडांच्या आधारावर अवलंबून असते. तसेच हाडांमधील कोणत्याही प्रकारची कमजोरी आपल्याला कमजोर बनवू शकते. यामुळेच हाडांची काळजी घेण्यासाठी अधिक महत्वाचे उपाय केले पाहिजेत. हाडांच्या कमतरतेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि दुखणे पाठी लागते. अशातच हाडांच्या कमतरतेमुळे स्थायू अनेकवेळा दगावतात. आणि मग याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीराला जाणवतो.

दररोज किती कॅल्शियम खाणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया तसेच कोणत्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे-
- प्रौढांना दिवसाला 10 मायक्रोग्राम ‘व्हिटॅमिन डी’ आवश्यक आहे.
- ‘व्हिटॅमिन डी’ अन्नपदार्थातून मिळणे कठीण आहे, म्हणून आपण ते सकाळी सूर्यप्रकाशापासून मिळवू शकतो.
- प्रथिने आणि कॅल्शियम व्यतिरिक्त, अंडी देखील व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोत आहे.
- एका मोठ्या अंड्यातील पिवळ बलक 36.7 IU व्हिटॅमिन डी शरीराला देते.
- व्हिटॅमिन डी साठी मशरूम उपयुक्त आहे त्यामुळे याचे सेवन केल्याने शरीराला पोषक तत्वे मिळतील.
- संत्र्याच्या सेवनाने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळू शकेल. तसेच फोर्टिफाइड प्रोटीन शरीराला मिळेल.
- गायीचे दूध जस जमेल तसे सेवन करावे. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता भासत नाही.
:max_bytes(150000):strip_icc()/vitamin-d-AdobeStock_270150827-d45cf603602540499b67ad0a6df3193d.jpg)
अशाप्रकारे आपल्या हाडांना निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी पुरेसे कॅल्शियम आवश्यक आहे. तसेच आपल्या शरीराला कॅल्शियम मिळण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. याचा अर्थ असा की कॅल्शियम व्यतिरिक्त, तुम्ही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-डीयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
हेही वाचा :