Friday, March 28, 2025
HomeमानिनीDiabetes : डायबिटीस रुग्णांसाठी हे पदार्थ विषासमान

Diabetes : डायबिटीस रुग्णांसाठी हे पदार्थ विषासमान

Subscribe

डायबिटीस हा एक गंभीर आजार आहे. पूर्वी हा आजार केवळ वयोवृद्ध रुग्णांमध्ये आढळायचा. पण, जीवनशैली बदलली आणि लहान मुले, तरूण मुले हा आजाराच्या विळख्यात येऊ लागली. डायबिटीसमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे डायिबिटीस रुग्णांनी आहाराच्या सवयीबद्दल विशेष काळजी घ्यावी असे सांगितले जाते. आहारात आपण जे खातो त्यातील काही पदार्थ रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात. आज आम्ही अशा तीन पदार्थांबद्दल तुम्हाला सांगणार आहोत जे डायबिटीस रुग्णांसाठी विषासमान मानले जातात. या पदार्थांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची दाट शक्यता असते.

पोहे –

पोह्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. पोह्यामध्ये विविध भाज्या वापरल्या जातात. जसे की, मटार, फरसबी. यातील काही घटक डायबिटीस रुग्णांसाठी योग्य मानले जात नाही. त्यामुळे तुम्हाला पोहे खायचेच असतील तर त्यात कडधान्ये, ड्रायफुट्स घालावेत आणि मग खावेत.

उपमा –

रव्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. अशावेळी तुम्ही उपम्यामध्ये शेंगदाणे टाकू शकता. शेंगदाणे प्रोटिनयुक्त असतात.

ब्रेड बटर –

गव्हाचा ब्रेड किंवा नॉर्मल ब्रेड प्रोसेस्ड करून तयार केला जातो. अशावेळी रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी हा ब्रेड नक्कीच कारणीभूत ठरू शकतो. तर बटरमध्ये फॅट्स असतात, जे कार्बोहायड्रेट्ससोबत मिसळल्यास रक्तातील साखरेची पातळी असंतुलित करू शकतात. अशावेळी तुम्ही मल्टीग्रेच ब्रेड आणि नट्स ब्रेड खायला हवा.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini