Monday, March 24, 2025
Homeमानिनीकोणत्या जातीचे कुत्रे पाळावेत?

कोणत्या जातीचे कुत्रे पाळावेत?

Subscribe

आजकाल प्रत्येकाच्या घरात कोणता ना कोणता पाळीव प्राणी दिसतोच. हे प्राणी तुमच्या घरात आणि तुमच्या जीवनातही बदल घडवून आणत असतात. यात प्रामुख्याने आपल्याला आजूबाजूला डॉग लव्हर्स जास्त दिसतात. मात्र, डॉग लव्हर्सनी घरी कुत्रा आणण्याआधी कुत्रांच्या विविध जातींची माहिती जाणून घ्यायला हवी. कारण अनेक जण हल्ली धोकादायक कुत्र्यांच्या जाती सुद्धा पाळू लागलेत.

परदेशी जातींचे संगोपन करण्याचा कल देशात खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा परिस्थितीत जगात अनेक ठिकाणी बंदी असलेल्या जाती देशात विकल्या जात आहेत. असे पाळीव कुत्रे तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी, कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत, घरासाठी कुत्र्याची निवड करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

पाळीव कुत्रा निवडण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या…

जागा –
जेव्हा आपण कुत्रा आणण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याकडे जागा किती आहे? हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या घरातील स्पेसनुसार आणि गरजेनुसार कुत्र्याची निवड करायला हवी. जर तुम्ही लहान घरात राहत असाल तर शिज्जू, पग यासारख्या जातीचे कुत्रे निवडायला हवेत. आणि जर घर मोठे असेल तर तुम्ही लॅब्रॉडॉग किंवा गोल्डन रिट्रीवरचा विचार करू शकता. जर तुम्हाला बंगल्यासाठी गार्ड डॉग हवा असेल तर अशावेळी तुम्ही जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याचा विचार करू शकता.

ॲक्टिव्हिटी लेव्हल विचार घ्या –
कुत्रा घरी आणताना त्याची ॲक्टिव्हिटी लेव्हल तपासणे महत्वाचे असते. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबियांना शांत स्वभावाचे कुत्रे हवे असतील तर तुम्ही पग, फ्रेंच बुलडॉगसारखे कुत्रे पाळू शकता.

जातीची निवड –
आजकाल अनेक प्रकारच्या कुत्र्यांच्या जाती बाजारात येत आहेत. मात्र, कुत्रा घरी आणताना सुरक्षा आणि गरजा लक्षात घेऊनच निवडावा. तुम्ही व तुमचे कुटुंबीय त्याच्यासोबत कम्फर्टेबल असाल तरच कुत्र्याला घरी आणा. यासाठी तुम्ही कुत्र्याच्या विविध जातींचा अभ्यास करायला हवा.

वय –
जर तुम्ही कुत्र्याचे पिल्लू घरी आणले तर ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना लहानपणापासूनच परिचित असेल. मात्र, अशावेळी त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांची लस, औषध यांकडे लक्ष ठेवावे लागेल.

कुत्र्याचा इतिहास –
अनेकवेळा आपण निवारा किंवा मालकाकडून कुत्रा विकत घेतो. अशा परिस्थितीत कुत्र्याच्या परिस्थितीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा पाळीव प्राणी वाईट परिस्थितीतून गेलेले असतात. त्यामुळे अशावेळी आपण जागरूक असायला हवे.

घरी आणण्यासाठी कुत्र्यांच्या जाती –

  • लॅब्रॉडॉग
  • गोल्डन रिट्रीवर
  • जर्मन शेफर्ड
  • बीगल
  • भारतीय स्पिट्स
  • पग

 

 

 


हेही वाचा : उन्हाळ्यात पेट्सची काळजी कशी घ्याल?

 

Manini