ब्रा घेताना काय काळजी घ्याल?

अनेक महिला चुकीच्या मापाची ब्रा घालतात. कधी कधी त्यांच्या ब्रा ची साइज एकतर खूप मोठी असते किंवा खूप लहान असते. कधी कधी लहान आकाराची ब्रा घातल्यामुळे खांदा आणि पाठ दुखीचा त्रास देखील होऊ शकतो. यांसारख्या अनेक समस्यांपासून सुटका मिळावी यासाठी योग्य आकाराची ब्रा निवडायला हवी. तुम्ही घरच्या घरी तुमची योग्य आकाराची ब्रा स्वतःच निवडू शकता. एक्सपर्ट्सच्या मते, जेव्हा तुम्ही आपल्या योग्य साइजची ब्रा वापरता तेव्हा तुम्हाला या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्या.

नॉन पॅडेड ब्रा वापरा

तुमच्या ब्राचे योग्य माप घेण्यासाठी आरामशीर आणि नॉन पॅडेड आणि सगळ्यात योग्य आणि फिट्ट ब्रा वापरा.

माप घेण्यासाठी मेजरिंग डेपचा वापर करा


योग्य मापाची ब्रा निवडण्यासाठी माप घेण्यासाठी मेजरिंग डेपचा वापर करा.

योग्य स्टाईलची निवड करा


ब्रा साईज बरोबरच योग्य स्टाईलचा देखील वापर करा. यांमध्ये पुश-अप ब्रा, बाल्कनेट ब्रा, मिनिमाइजर ब्रा किंवा स्पोर्ट्स ब्रा यांचा वापर करा. मात्र तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या स्टाईलची निवड करता. तेव्हा साइजमध्ये लहान बदलावासाठी तयार रहा.

शक्यतो कॅटन ब्रा वापरा


ब्रा साईज आणि स्टाईलसोबतच कॉटन ब्रा चा देखील वापर करा. कारण कॉटन ब्रामुळे शरीराला आलेला घाम शोषून घेतला जातो.

हलक्या रंगांची ब्रा वापरा


ब्रा वापरताना शक्यतो हलक्या रंगाचा वापर करा. काळा, लाल, निळा यांसारख्या गडद रंगांच्या ब्रा कमी प्रमाणात वापरा.


हेही वाचा  :

पार्टी, लग्नासाठी जाताय? मग अशी करा नेलपॉलिशची निवड