घरलाईफस्टाईलपुण्यातील 'डिस्को' भजी नेमकी आहे तरी कशी? कृतीसह जाणून घ्या

पुण्यातील ‘डिस्को’ भजी नेमकी आहे तरी कशी? कृतीसह जाणून घ्या

Subscribe

पुण्यात मिळणाऱ्या या डिस्को भजीची चव तुम्ही नक्कीच चाखायला हवी. लोक लांबून ही भजी खाण्यासाठी नारायण पेठेत येतात.

पावसामुळे बाहेर सर्वत्र गारवा पसरला आहे आणि पावसाळा म्हटलं की नेहमी काही तरी गरमा गरम खायची इच्छा सर्वांनाच होते. पावसाळा आणि गरम गरम चहा आणि भजी असा खमंग बेत नेहमीच प्रत्येकाच्या घरी किंवा मित्र मंडळींच्या ग्रुपमध्ये ठरत असतो. आजपर्यंत पालक, कांदा, बटाटा आणि कोबीपासून बनवलेली भजी तुम्ही खाल्लीच असेल. पण पुण्यात सुद्धा एक विशेष भाजी मिळते. पुण्यात मिळणाऱ्या या डिस्को भजीची चव तुम्ही नक्कीच चाखायला हवी.

हे ही वाचा –  नाश्ता किंवा लंच ऐवजी ‘ब्रंच’ करण्याचा नवा ऑप्शन किती फायदेशीर ? जाणून…

- Advertisement -

पुण्यातील नारायण पेठ इथे तुम्हाला या आगळ्या वेगळ्या डिस्को भाजीची चव चाखायला मिळेल. पुण्यातील नारायण पेठेत वैभव जंगम यांनी खास खाद्य प्रेमींसाठी डिस्को भजीचा हा नवीन प्रकार उपलब्ध केला आहे. केवळ सहा महिन्यांमध्ये या डिस्को भजीला खवय्यांकडून विशेष पसंती मिळताना दिसते आहेत. या भजीची लोकप्रियता सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. याच संदर्भांत वैभव जंगम याना विचारले असता ते म्हणाले, ”गेल्या सहा वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठेत माझी स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर या नावाने वडापाव आणि भजीची गाडी आहे. ती सुरुवातीपासूनच उत्तम चालायची मात्र गेल्या सहा महिन्यांनपासून मी डिस्को भजी हा भज्यांचा नवीन प्रकार खाद्य प्रेमींसाठी तयार केल्यापासून ग्राहकांचा त्याला खूपच जास्त प्रतिसाद मिळत आहे. लोक लांबून ही भजी खाण्यासाठी नारायण पेठेत येतात. भजी तयार केल्यापासून पाचव्या ते दहाव्या मिनिटाला सगळी भजी संपते. एका वेळी ३५ प्लेट भजी बनविली जाते. डिस्को भाजीच्या एका प्लेटची किंमत २० रुपये आहे.” असं वैभव जंगम म्हणाले.

हे ही वाचा –   रोजच्या भाजीला द्या एक वेगळा ट्विस्ट; ‘या’ पद्धतीने द्या फोडणी नावडती भाजीही…

- Advertisement -

दरम्यान ही भजी खाण्यासाठी प्रामुख्याने लोक संध्याकाळी गर्दी करतात. ही भजी खाण्यासाठी लोक लांबच लांब रंगा लावतात. भजी तयार झाल्यानंतर काही मिनिटातच ती फस्त होते.

डिस्को भजी बनविण्याची प्रक्रिया

डिस्को भजी बनविण्यासाठी प्रामुख्याने हिरव्या मिरचीचा वापर केला जातो. डिस्को भजी बनविण्यासाठी सर्वांत आधी हिरवी मिरची डाळीच्या पिठामध्ये घोळवून हाफ फ्राय करून घ्यावी. त्यांनतर मिरचीचे बारीक तुकडे केले जातात. ते तुकडे सोनेरी रंग येईपर्यंत पुन्हा तळले जातात. त्यांनतर ही बाजी भाजी पुन्हा एकदा काही विशिष्ट मसाल्यांमध्ये घोळवले जातात. अशी कृरुकीत भजी खाण्यासाठी वैभव जंगम यांच्या कडे खवय्ये गर्दी करतात.

हे ही वाचा –   खूप सोप्पंय! ‘या’ टिप्स वापरा आणि मऊ इडली बनवा

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -