शरीरासाठी प्रोटिनची आवश्यकता असते. तज्ञही प्रोटिनयुक्त आहार घ्यावा असे सांगतात. प्रोटिनसाठी अंड खाल्ले जाते. अंड हे एक सुपरफूड आहे. प्रोटीन व्यतिरिक्त यामध्ये विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सुद्धा आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. काहीजण सकाळी न चुकता अंडी खातात तर काहीजण अंड खायला कंटाळा करतात, विशेष करून लहान मुले अंडी खात नाहीत. त्यामुळेच आज आम्ही असे कोणते पदार्थ आहेत जे अंड्यासमान प्रोटिन शरीराला देतात ते सांगणार आहोत.
टोफू
सोयाबिन हा प्रोटिनचा उत्तम स्त्रोत आहे. यापासून टोफू तयार करण्यात येतो. टोफूमध्ये प्रोटिन, लोह, कॅल्शियम, खनिजे आढळतात. एका रिसर्चनुसार, टोफू हा अंड्यासाठी बेस्ट पर्याय आहे. टोफू मऊ असतो शिवाय त्याची चव हलकी अंड्यासारखी असते. त्यामुळे तुम्ही जर शाकाहारी असाल तर रिच प्रोटिनसाठी टोफू खायला हवा.
चिया सीड्स –
चिया सीड्स एक सुपरफूड आहे. जर तुम्ही चिया सीड्स पाण्यात मिक्स केल्यात तर जेलसारख्या तुम्हाला दिसतात. तज्ञांच्या मते, ग्लुटेन फ्री बेक्ड फूड्समध्ये बाइडिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या चिया सीड्स अंड्यासमानच आहेत. चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर असते. याशिवाय फायबर,कॅल्शियम आणि ऍटी-ऑक्सिडंट चिया सीड्समध्ये आढळतात.
अळशी –
काही ठिकाणी कुकीज, मफिन आणि ब्रेडमध्ये अंड्याऐवजी अळशीच वापर केला जातो. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड, फायबर आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. अळशीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. अंड्याला पर्याय म्हणून अळशीचा वापर करू शकता. यासह त्याची पूड करुन कोमट पाण्यासह पिऊ शकता.
ऍपल सॉस –
मफिन, केक सारख्या बेकिंग डिशेससाठी ऍपल सॉसचा वापर केला जातो. अंड्याला पर्याय शोधत असाल तर ऍपल सॉस बेस्ट पर्याय आहे. यातील साखर एक्स्ट्रा फॅटची गरज कमी करत पदार्थात गोडवा आणि मऊपणा आणते. ऍपल सॉस फायबर, व्हिटॅमिन आणि अँन्टीऑक्सिडेंटचा एक समृद्ध स्रोत आहे.